पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. २३ || पाजून आम्हांस संसारबंधापासून मुक्त करण्याकरितां, तुह्मीं आपल्या संसाराला जन्मतःच तिलांजलि दिली ! * अखिल प्राणीमात्रांना परमार्थाची ओळख करून देण्याकरिता, अहो समर्था, तुम्ही आपल्या स्वार्थाचा होम केला ! आणि अंगाला वालवयांतच असंगाची राख फासून तीव्र वैराग्य धारण केले ! आह्मांतील अज्ञानांधकाराचा नाश करण्याकरितां, तुह्मी आपल्या ज्ञानसूर्याचा प्रकाश या भूमंडळावर प्रकाशित केला ! सकल जगताची मुखश्री प्रसन्न करण्याकरितां ही तेजःपुंज कांति धारण केली ! आमच्या पापाच्या असंख्य राशी जाळून खाक करण्याकरिता आपल्या सुकृताचा अग्नि प्रदीप्त केला ! आमची चित्तशुद्धि करण्याकरितां सात्विकगुणसंपत्तीचे भांडार बरोबर घेऊन आलो ! त्रैलोक्याचे वैभव वृद्धिंगत करण्याकरिता आपल्या तृष्णेचा उच्छेद केला ! लोकांचे मनोरथ पूर्ण करण्याकरितां आपल्या वासना जाळून दग्ध केल्या ! आणि आम्हां सवसि लौकिकास चढविण्याकरिता आपला स्वतःचा लौकिक पायाखाली तुडविला! त्या तुह्मां समर्थांचे यश आम्ही कोठवर वर्णन करावे ? आम्ही अत्यंत पातकी, मति : मंद आणि दुष्टबुद्धि असून संसार-उपाधीने त्रस्त झालो आहों ! परंतु ज्या प्रायश्चित्ताच्या योगानें वाल्मीकासारखा वाटपाड्या कोळी त्रैलोक्यवंय ऋषि झाला ते सर्व प्रायश्चितांत उत्तम असे जे पश्चात्ताप प्रायश्चित्त ते घेऊन आम्ही सर्व प्रतिष्ठानवासी जन अत्यंत लीन होऊन सदुरुचरणीं शरण रिवालों आहों ! तरी अहो ज्ञानराजा, आमच्या हातून घडलेले सहस्र अपराध आपण पोटांत घालावे आणि ज्या आपल्या कृपेने पशु वोलता झाला ती कृपा आमच्यावर करावी ! | ज्ञानेश्वर- श्रेष्ठहो, आम्हां पामरांचा आपण व्यर्थ गौरव करीत आहा ! अहो, आम्ही सदां तुमच्या अनुग्रहाचे भुकेले आहों ! तुमच्या चरणरजाच्या स्पर्शानेच आम्हांला शुद्धता येणार आहे ! आम्ही दुबळीं लेंकरे तुमच्याच आशीर्वादाने ईशकृपेस पात्र होणार आहों ! हा पशु बोलता झाला ही तुमचीच