पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. कृपा होय ! तुमच्या कृपेचा महिमा ब्रह्मदेवालाही चारी मुखाने । वर्णन करितां येत नाहीं ! तुम्हां समर्थांच्या अंगचे सामर्थ्य आह्मां दुबळ्या लेकरांच्या अंगी कोठून येणार ? तुम्ही ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ ! तुम्ही सागराचा वोट केला ! सृष्टीवर सृष्टि केली ! सूर्यासारखी छाटी तापविली ! काठीवर पृथ्वी धरली ! सर्पकुळे जाळलीं ! वसूला आयुष्य दिॐ ! शशीला क्षयरोगी केलें ! तुह्मी आपल्या मंत्राने इंद्राला आपले पद सोडावयास लावतां ! तुम्हीं निर्जिवाला जीव देऊन बोलवितां ! मृत्तिकापाषाणाची प्राणप्रतिष्ठा करून त्याला देवपणा आणतां ! तेव्हा तुम्हां समर्थांच्या कृपाकटाक्षाने ह्या महिपाला वाणी फुटून तो कां व बोलणार नाहीं ? ही सर्व तुमचीच अगाध करणी आहे ! नाही तर आम्हां जातिहीनांच्या हातून काय होणार ? तरी श्रेष्ठहो आम्हांस शुद्धिपत्र देऊन अलंकापुरी परत जाण्याची अनुज्ञा द्यावी ! बोपदेव- अहो समर्थ ज्ञानराजा, ब्रह्मांडाचा कर्ता जे प्रभु त्याच्यासारखी अघटित वटना करून दाखवून तुम्हीं आपली कीर्ति अरिवल भूमंडळांत पसरली आहे ! हेंच शुद्धिपत्र सर्वात श्रेष्ठ आहे ! अहो हरिप्रिया, आकाशाला मंडप कोण देईल ? हा भूगोल कोण कोठे लपवील ? सरितापतीला रांजणांत कोणाला भरतां येईल ? आणि सुर्याला कोण झाकून ठेवील ? त्याप्रमाणे तुम्हांला शुद्धिपत्र देणे आम्हांस लाजिरवाणे आहे ! तरी पण सद्गुरूंची आज्ञाच होत आहे, म्हणून हे शुद्धिपत्र समर्थचरणीं आम्हीं अर्पण केले आहे ! ( शुद्धिपत्र देऊन ) तरी याचा अंगीकार करून आणि उपनयनादि शास्त्रप्रणीत संस्कार येथेच करून समर्थांनी या प्रतिष्ठानक्षेत्रींच रहावे अशी आमची समर्थचरण विज्ञप्ति आहे. तुम्ही महापुरुष, मुक्तीचे द्वार, आमच्या भाग्योदयाने आह्मांला लाभला आहां ! आपलें परम मंगलदर्शन नित्य वडल्याने आमच्या पापराशी दुग्ध होणार आहेत ! आणि आपले बोधामृत प्राशन केल्याने आमचे अनंत जन्मांचे दुःख लयास जाणार आहे ! तरी या प्रतिष्ठानक्षत्री वास करण्याबद्दल आम्हीं समर्थचरणीं केलेली प्रार्थना समर्थांनी मान्य करावी !