पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. २५ ज्ञानेश्वर०- अहो द्विजश्रेष्ठहो ! तुम्ही आज हे शुद्धिपत्र आम्हांस दिल्यामुळे आह्मी कृतार्थ झालों ! आम्ही अर्थहीन आणि भाग्यहीन पडलों, तेव्हा आपल्या या उपकाराची फेड आमच्या हातून कशी होणार ? श्रेष्ठहो, मौंजीबंधनाविषयीची आपली अनुज्ञा वेदशास्त्रानषिद्ध आहे. आजपर्यंत असे कोणीं कधीं केलें नाहीं. आम्हांस व्रतबंध मुळीच नको आहे. हा मृत्युलोक पाप आणि मरण यांनी ग्रासलेला असून अज्ञान आणि निंद्रा यांनी परिवेष्टित आहे. आणि या मृत्युलोकांत निर्माण झालेले पंचभूतात्मक आणि कर्मगुणवेष्टित देह सदां जन्ममृत्यूच्या चक्रावर घातलेले आहेत. तेव्हां असे हे आमचे देह परमेश्वरसेवेत झिज वून आम्ही पुनीत करून घेऊ. आणि सर्वांभूती ब्रह्मभावना धरून तीव्र अनुतापयुक्त अंतःकरणाने, अमृतापेक्षांही उदार, आणि सर्व सारांतील मुख्य सार, जे ईश्वराचे नांव, ते मुखाने गाऊन जन्माचे सार्थक करून घेऊ : कारण, देवाविणशून्यमुख ॥ नामनघेतांनाहींसुख ॥ अंतींहोईल रेदुःख ॥ नामनसतांमुखीं ॥ १ ॥ रामकृष्णगोविंद ॥ हरिमाधवपरमानंद ॥ नित्यऎसाजयासिछंद । तोचि सुलभगर्भवासीं॥ ध्रु० ॥ अनंतनामनिरसून ॥ एकमार्ग तोचिमान्य ॥ जेणेजोडेनित्य सौजन्य ॥ तोचिरामकृष्ण उच्चारी॥ २॥ ज्ञानदेवेंअनुमानले ॥ मगभक्तिसुखसाधलें ॥ रामकृष्णउच्चारिलें ॥ जेतारकतिहींलोकीं ॥ ३॥ आणि शिवाय जन्मजगदुःखबाधा ॥ स्मरतांनाहींगोविंदा ॥ ऐसा जयासीनित्यधंदा ॥ तोचिसदासुखरूप ॥ १ ॥ धन्य कुळधन्ययाति ॥ धन्यजन्मपुढतीपुढती ॥ भक्तीविण नाहींगति ॥ मुखांहरिनाम-उच्चार ॥ ध्रु० ॥ विश्व विश्वजोव्यापकु ॥ तोचिमाझा हारिएकु ॥ १॥ त्यासी भक्तिविणसाधकु ॥ नोळखेपेंदुर्बुद्धि ॥ २॥ ज्ञानरंजन रंजला ॥ ज्ञानबोधेउपजला ॥ ज्ञानदेवींहारिसेविला ॥ निरंतरसर्वकाळ ॥ ३ ॥