पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. बोपदेव-अहाहा ! सद्गुरु समर्था, धन्य धन्य आहा तुम्ही !! सिंधुही हाताने तरून जातां येईल ! मेरूलाही माशी उचलून धरील ! परं तु मनुष्यजन्मांत येऊन आपल्यासारख्या ज्ञानश्रेघांची भेट होण्यास गांठीं थोर पुण्यच पाहिजे ! आमचा अनंत जन्मांचा साधनोपाय आज फळाला आल्यामुळे तुह्मां संतवृंदाचे पाय आम्हांस जोडले आहेत ! तेव्हां आतां सद्गुरूंनी येथे राहून आमच्या हातून सेवा घ्यावी. कारण तुम्हांसारख्या संतांच्या सेवेत आमचे देह झिजले असता आह्मांस अपार पुण्य लाभणार आहे! अहो ज्ञानराजा, आझी मूर्ख, दुरात्मे, नष्ट आहों ! अज्ञानमोहाने मोहित झाल्यामुळे वृथा पांडित्याची वटवट करून आम्ही कष्टलो आहों ! तापत्रयाग्नीने संतप्त झालो आहों ! आणि अहंसन्निपाताने मृतप्राय झालो आहों ! आणि ह्मणूनच तुह्मां श्रेष्ठांस अनन्यभावानें शरण रिवालों आहों. तुमच्यासारखे परात्पर सद्गुरू जर आम्हांला सोडून गेले तर या दुस्तर भवनदीतून आह्मांला पैलपार कोण नेईल ? आम्हांला सच्चिदानंद प्रभूची ओळख कोण करून देईल ? आम्हांला प्रवृत्तिमार्गातून काढून निवृत्तिमार्गास कोण लावील ? आमची अज्ञानमय अहंकृति घालवून ज्ञान जें ब्रह्म त्याची आम्हांला कोण ओळख करून देईल ? आणि वैकुंठाचा सोपान आम्हांकडून चढवून आह्मांला मुक्तिपदाप्रत कोण नेऊन पोहोंचवील ? मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहावे ? कोणाची करुणा भाकावी ? कोणता मार्ग स्वीकारावा ? तरी अहो सद्गुरुनाथा, ज्या योगाने आमच्या जन्माचे सार्थक होईल असा उपाय आम्हांला सांगावा. ह्मणजे आपल्या गुरुवाक्याप्रमाणे वागून आम्ही हा भव तरून जाऊ ! | ज्ञानेश्वर०- अहो सुजनहो, तुम्ही सर्व जाणतच आहा. तेव्हा मी ते तुम्हांला काय सांगणार ? परंतु माझे श्रीनिवृत्तिनाथ सद्गुरु भूसंकेताने आज्ञा करीत आहेत, म्हणून त्यांची अनुज्ञा शिरसा चंदून, सद्गुरु बोलवतील ते चार शब्द मी तुम्हांला सांगत. तिकडे सर्वांनी अवधान द्यावे. सुजनहो, राजा जनकासारखे प्रपंचांत राहून कर्माचरण करूनच मोक्षाला गेले ! तेव्हा हा