पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/37

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. २७ संसारच तुम्हांला पारमार्थिक मोक्षाची वाट दाखविणारा वाटाड्या आहे. प्रपंचांत राहिल्याने परमार्थप्राप्तीच्या मार्गात अनेक विघ्ने येतात असे तुम्हांस वाटत असल्यास तो तुमचा भ्रम आहे. मात्र भगवंताने जातिपरत्वें जो धर्म तुम्हांला लावून दिला आहे, तो तुमचा स्वधर्म, या प्रपंचांतील नित्याचा यज्ञ आणि तुम्हांला सुख देणारा आणि तुमचे हित साधणारा तुमचा खरा मित्र आहे, है मात्र तुम्ही विसरता कामा नये. हा स्वधर्मरूप यज्ञ तुम्ही अहेतुक मनाने आणि निष्काम बुद्धीने आचरण कराल, तर तो तुम्हांला कामधेनूप्रमाणे फलद्रूप होईल आणि हा दुःखमय भासणारा संसार तुह्मांस सुखप्रद होईल. या यज्ञात तुमच्या हातून घडणा-या पूजेने सर्व देवता प्रसन्न होऊन त्या तुम्हांला अप्राप्य वस्तूंची प्राप्ति करून देतील. तुमचे पूर्वजन्मांचे दोष नाहींसे होतील. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुह्मी जें ह्मणाल ते तुमच्या हातून घडेल. शरीरभोग दूर पळतील. अकाली मृत्यु टळेल. तेज, बल, आणि यश हीं प्राप्त होतील. तुम्ही तोंडांतून जो शब्द काढाल तो खरा होईल. तुमची आज्ञा सर्व प्राणीमात्र पाळतील. तुमची बुद्ध सर्वव्यापक होईल. ऋद्धिसिद्धि तुमच्यापुढे हात जोडून उभ्या राहतील. सुदैव आणि लक्ष्मी तुमचा शोध करीत तुम्हांला हुडकीत येतील. सर्व भोगांची प्राप्ति होऊन तुम्ही सुखी व्हाल. स्वधर्म पुण्याईच्या बळाने, जिला गुणत्रयांचा संपर्क लागत नाही, अशा सुबुद्धीचा तुमच्या अंतःकरणांत उदय होऊन संसाराचे भय नाहींसें होईल. सुबुद्धीचा उदय होतांच तुमची चित्तशुद्धि होईल. चित्तशुद्ध झाली ह्मणजे तुह्मी सद्गुरुकृपेने ज्ञानी व्हाल आणि ज्ञानामागून मुक्त स्वरूप आत्मसिद्धीप्रत पावाल. आणि अशा रीतीने तुम्ही निश्चलबुद्धि होऊन परमेश्वरस्वरूपीं निमग्न झाला म्हणजे समाधीचे अखंड सुख तुम्ही भोगाल. त्यावेळी तुमची दृष्ट परमेश्वराचेच रूप पाहूं लागेल. तुमचे मन परमेश्वराचाच संकल्प वाहूं लागेल. तुमची जिव्हा परमेश्वराचेच गुणानुवाद गाऊ लागेल. तुमचे कर्ण ईश्वरलीलाच ऐकू लागतील. परमेश्वराची