पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮ श्रीज्ञानेश्वर महाराज. सेवा हेंच भूषण तुम्ही अंगावर धारण कराल आणि आत्मबोधानाचे भोजन जेवून तृप्त व्हाल. आणि अशा रीतीने तुम्ही ब्रह्मानदी निमग्न झालां, ह्मणजे हे कर्म आणि मी त्याचा कर्ता, हा मिथ्याभिमान तुमच्या चित्तांत उरणार नाही. काम, क्रोध हे तुमच्या पुढे उभे राहणार नाहीत. शुभाशुभाचा भेदाभेद तुमच्या ठिकाणी उरणार नाही. मायेने तुह्मी बद्ध होणार नाही. इंद्रियांचे बंड मोडेल आणि इंद्रियांच्या गतीने विक्षेप पावणारी तुमची बुद्धि स्थिर होईल. मोह नष्ट होईल. विषयवासनेची गोडी लयास जाईल. सान्या चित्तवृत्ति सद्बुद्धीच्या आज्ञेत वागू लागतील. संकल्पाविकल्पाने तुमचे मन विटाळणार नाही. अंगीं वैराग्य उत्पन्न होईल. आणि त्याचे मागून निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन सच्चिदानंद प्रभूची मूर्ति तुमच्या हृदयांत प्रगट होईल. श्रेष्ठहो, तेव्हां तुह्मांला इतकेच सांगणे आहे की, या प्रपंचांत तुझी सर्व कर्मे निष्काम बुट्ठीने करा; ह्मणजे तुह्मी कर्मबद्ध होणार नाही. प्रपंचांत स्वधर्मानेच धन मिळवा आणि स्वधर्माकडेच त्याचा खर्च करा. देह हाच आत्मा, विषयांचे सुख भोगणें हेंच कायतें साफल्य, ही भ्रांति सोडून देऊन ही सर्व संपात्त हवनद्रव्य आहे असे समजून स्वधर्मयज्ञाच्या द्वाराने आदिपुरुषाला अर्पण करा. तुमचा स्वधर्म आचरण्याला किती जरी कठीण असला, तो पाळतांना तुह्मांला किती जरी दुःख झालें, तुमच्यावर अगणित संकटे आली, तुमच्यावर निंदेचे काहूर कोसळले, किंवा तुह्मांवर जरी प्राणांत संकट ओढवलें, तरी तुम्ही स्वधर्म सोडू नका; म्हणजे तुम्ही संसारबंधा. पासून मुक्त व्हाल. परंतु स्वधर्माची कास सोडून जर तुम्ही या प्रपंचीं राहादाल, तर मात्र इहलोकीं निरंतर दुःख आणि परलोकीं अक्षय नरकवास यांचीच तुम्ही जोड कराल. कारण, स्वधर्म सुटला कीं सुखाचा थारा मोडला. मग तुमच्यांत देहाभिमान वाढेल. इंद्रियांचे लाड पुरविण्याचा तुम्हांला हव्यास सुटेल. विषयांची धुंदी नेत्रावर चढेल. संपत्तीचा मद अंगांत संचरेल. मनाची शांति नष्ट होऊन दुर्बुद्धि तुमच्या हृदयांत साम्राज्य