पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/39

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. २९ करूं लागेल. मग मनाची तळमळ सुरू होईल. शाकदुःखाच्या आहळाने शरीर करपून जाईल. आधिव्याधि हात धुवून पाठीस लागतील. परमेश्वराची आठवण बुजेल. तेव्हां त्रिभुवनांतील पातके आणि संकटें तुम्हांला भूतांप्रमाणे गराडा देतील. तुमचे बापभाऊ, इष्टमित्र, तुम्हांला तोडून खातील. लोक तुम्हांला गांजतील. अनान्नदशा तुम्हांला येईल. मृत्यु प्रातक्षणी आपले विक्राळ स्वरूप दाखवून तुम्हांला भिववील. मग तुमची दशा काय विचारतां ? असा कठीण काळ आल्यावर तुम्हीं केवढ्या मोठ्याने जरी आक्रोश केला, तरी त्यांतून तुमची मुक्तता तेव्हां कोण करील ? श्रेष्ठहो ज्या प्रभूनें तुम्हाला हे वैभव दिले आहे त्याला तुम्ही अनन्यभावाने भजा. यज्ञनारायणाला आणि अग्निनारायणाला हवन या. देवाचे पूजन करा. सद्गुरुंना शरण जा. दुर्बळांना साहाय्य करा. अतिथींचा सत्कार करा. श्रेष्ठांना वंदन करा. आपल्या ज्ञातीला संतोष द्या. माता, पिता ही आराध्यदैवते समजून त्यांना संतुष्ट राखा. कोणाचा घातपात करूं नका. परनिंदेने जिव्हा विटाळू नका. हाताने दानधर्म करा. आणि जगामध्ये कीर्ति पसरून स्वधर्माचा मान वाढवा. तुह्मी चारी वर्णात श्रेष्ठ ! सर्व वर्णाचे आदिगुरु ! ह्मणून तुम्हांला माझे पुन्हा पुन्हा हेच सांगणे आहे की, तुझी कामनारहित होऊन उचित अशा धर्माने वागा. तुम्ही समर्थ आणि ज्ञानी ! तेव्हां तुम्हीच धर्माने वागू लागला, म्हणजे सामान्यजनांनाही तोच मार्ग लागून तेही तसेच वागू लागतील ! ( इतक्यांत ' नारायण ' नामचा उच्चार करीत श्रीमत्परमहंस रामानंद भी येतात ). | विठ्ठल- (श्रीरामानंदस्वामींस ओळखून आतुरतेने पुढे होऊन) श्रीमत्परमहंस सद्गुरुस्वामीमहाराज, श्रीवाराणसीक्षेत्री आपल्या पुण्याश्रमीं राहून, आपल्या उपदेशाने सुबोधित झालेला हा आपला चैतन्य आणि प्रापंचिकांत विठ्ठल या नांवाने वर्तणारा सदुरुंचा हा दास सप्रेम अंतःकरणाने सदुरुचरणांवर मस्तक ठेवीत आहे. ( विठ्ठलपंत श्रीरामानंदस्वामींचे चरणावर मस्तक ठेवितो. ते * कल्याणं भवतु' असा आशीर्वाद देऊन त्याला उठवून आलिंगन