पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/40

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० श्रीज्ञानेश्वरमहाराज, देतात. ) सद्गुरुमहाराज, बहुत वर्षांनी लाभलेल्या आपल्या या पुण्यकारक दर्शनाने मी आज कृतार्थ झालों ! रुक्मिणी०- ( स्वामींत नमस्कार करते, स्वामी तिला ' अखंड सौभाग्यवती भव ' असा अशीर्वाद देतात.) | रामानंद- विठ्ठलपंत, रुक्मिणीमातोश्री, तुह्मां उभयतांचे क्षेम आहेना ? - विठ्ठल- स्वामीमहाराज, आपल्यासारखे सद्गुरु आमचे क्षेम चालविणारे असल्यावर आम्हांला काय उणे पडणार ? सदुरुरुपेच्या सावलीत आम्ही उदंड सुखांत नांदत आहों ! स्वामींच्या आशीर्वादाने आम्हांला हीं चार मुक्ताफळे लाभली आहेत ! ( विठ्ठलपंत चारी मुलांस पुढे करितो. श्रीनिवृत्तिनाथमहाराज, श्रीज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव व मुक्ताबाई स्वामींस दंडवत घालितात. ' विजयी भव' असा आशीर्वाद देऊन स्वामी प्रत्येकास उठवून आलिंगन देतात व श्रीज्ञानेश्वरमहाराज आणि मुक्ताबाई यांस पोटाशी धरून प्रेमाने त्यांच्या तोंडांवरून हात फिरवितात. ) आणि सद्गुरुकृपेने आज या प्रतिष्ठानवासी सकल श्रेष्ठ भूदेवांना, अनुकंपायुक्त अंतःकरणाने ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे हातांतील शुद्धिपत्राकडे बोट दाखवून ) में शुद्धिपत्र देऊन आम्हा सर्वांना आज पावन केले आहे ! ( सर्व पुरुष व स्त्रिया स्वामींस नमस्कार करतात. स्वामी सर्वांत “ अभीष्टफलप्राप्तिरस्तु ' असा आशीर्वाद देतात. ) । रामानंद-( मनाशी ) अहाहा ! या रामानंदाचे केवढे थोर भाग्य हे, की आदिमायेसह प्रत्यक्ष शिव, विष्णु, ब्रह्मा यांच्या परम मंगलदायक प्रेमालिंगनाचा अत्यंत दुर्लभ लाभ मला या युगीं आज होत आहे ! ( उघड ) विठ्ठलपंत, रुक्मिणी मातोश्री, केवढी ही तुमची थोर पुण्याई ! की अशी स्वयंप्रकाशित तेजोराशी देदीप्यमान बालकें तुमच्या उदरीं या युगीं जन्मास आलीं ! आणि अहो प्रतिष्ठानवासी जनहो तुम्हीही धन्य आहा ! की अशा त्रि: जगतापहारी बालतपोनिधींचें तुह्मांला आज दर्शन झालें ! ज्ञानेश्वर- श्रीपादस्वामी, तातांच्याप्रमाणेच, आम्हां अज्ञ