पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. ३१ बालकांवरही स्वामींचे कृपाछत्र सदा असावे, म्हणजे आह्मांला कशाचेही भय उरणार नाहीं ! रामानंदु-अहाहा ! बाळा किती रे तुझे हे गोड शब्द ! विठ्ठलपंत या बालकांची नांवे काय ठेविली आहेस ते सांग बरें ? | विठ्ठल०- अहो गुरुराजसमर्था, हा माझा ज्येष्टपुत्र, याचे नांव निवृत्ति, स्वामींनी हृदयाशी धरलेला माझा मध्यमपुत्र, ज्ञानदेब, हा कनिष्ठ, सोपान, आणि ही कन्या, मुक्ताबाई ! रामानंद- विठ्ठलपंत, ऐक. श्रीजगदीशाने माझ्या अंतः-- करणांत उत्पन्न केलेल्या प्रेरणेवरून मी तुला संन्यास आश्रम टाकून प्रपंचांत शिरण्याबद्दल अनुज्ञा केली. तरीपण माझ्या हातून या वेदशास्त्रबाह्य कर्माचा घडलेला संसर्ग धुवून जावा, ह्मणून मी आजपर्यंत तीर्थयात्रा करून अनेक सिद्ध पुरुषांना वंदन केले. या यात्रेत सकलपापविनाशी चंद्रभागेचें स्नान आणि कैवल्यपद प्रात करून देणारे श्रीपंढरीनाथाचे दर्शन मला वडलें. विठ्ठलपंत, तुला काय सांगू ? दानवस्तूंवर तुलसीपत्र ठेवून प्रापंचिक लोक त्या ज्याप्रमाणे ब्राह्मणांना अर्पण करतात, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या देहांवर तुलसीकाष्ठमाळा ठेवून आपले देह श्रीपांडुरंगाला अर्पण केले आहेत, असे आपल्या विवेकरूप खाने कामक्रोधादिक षड्बैयांवर वार करणारे हजारों वारकरी, उपसनामार्गाचा धर्मध्वज ज्या पताका त्या खांद्यावर टाकून मुखाने श्रीविठ्ठलनामाचा गजर करीत श्रीपांडुरंगाच्या भेटीला लोटत आहेत, अशा त्या सर्व क्षेत्रांतील श्रेष्ठ अशा पंढरीक्षेत्राचे मी कोठवर वर्णन करू ? जेथे हरिनामाचा गजर अखंड चाल आहे अशा त्या भूवैकुंठक्षेत्री, ज्ञानदेवा ऐक, मी श्रीपांडुरंगाच्या चरणीं मस्तक ठेवून हात जोडून पुढे उभा राहिलो असतां, श्रीपांडुरंगांनी ( आपल्या गळ्यांतून तुलसीकाष्ठमाला काढून ) ही तुलसीकाष्ठमाला आपल्या कंठांतून काढून माझ्या हातात दिली, आणि मला प्रभूनी अशी आज्ञा केली कीं, रामानंदा, तुझा शिष्य विठ्ठलपंत, याला तुझ्या आशीर्वादाने तीन पुत्र झाले आहेत; त्यांपैकीं मध्यम पुत्र ज्ञानदेव माझाच अंश आहे ! यासाठी