पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ अंक १ ला. साठी तुम्ही उभयतांनी हे वृथा संसारओझे वाहणे सोडून आणि हें प्रपंचमायाजाल दूर लोटून बद्रिकाश्रमीं जावे, आणि तेथे परमेश्वराची एकनिष्ठेने उपासना करून देहसार्थकता करून घ्यावी, अशी माझी तुम्हां उभयतांना आज्ञा आहे. विठ्ठल०- सद्रूंची आज्ञा आम्हां उभयतांना वेदाज्ञेप्रमाणे शिरसा वंय आहे ! स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही आतां असेच बद्रिकाश्रमाकडे निवतों. परंतु श्रीस्वामीचरणीं इतकीच विज्ञप्ति आहे कीं, आम्हां दीनसेवकांवर स्वामींची कृपा अशीच अखंड असावी ! आणि या आमच्या अज्ञ लेकरांच्या मस्तकांवर स्वामींचा वरदहस्त असावा ! ( सर्व मुले स्वामींस नमस्कार करतात. त्यांस स्वामी ' सर्वत्र विजयीभव ' अस’ आशीर्वाद देतात. ) | ज्ञानेश्वर- ताता, देहसार्थकता ज्याची त्याजपाशीच आहे ! सकळ तीर्थव्रतांचें सार, सच्चिदानंद प्रभू सच्या हृदयीं नांदत आहे ! मग देशांतरीं हिंडून अधिक ते काय मिळणार ? मृगाच्या नाभीत परिमळ आहे, पण ते न जाणतां तो परिमळाकरितां रानोरान हिंडू लागला तर त्याला समाधान कोठून मिळणार ? हें मनरूपी लण ज्या सागरांत निर्माण झाले त्या सागरांत जर ते जाऊन विराले, तर अनंत जन्मांचा शीण जाऊन आनंदीआनंद होणार आहे ! तरीपण सद्गुरूंच्या मनोयाप्रमाणे तातांनीं आचरण न आपले स्वाहित करून घ्यावें ! रामानंद- बाळा ज्ञानवा, या तुझ्या ज्ञानी भाषणाने आम्हांला अष्टभाव दाटले . ! मातोश्री, तुम्हीं उदंड तप केले आणि म्हणूनच शिव, उष्णु, ब्रम्हासारखे पुत्र तुमचे उदरीं जन्मास आले ! विठ्ठल- ( श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज यांस पोटाशी धरून व त्यांचे मुख कुरवाळून च र हुंगून ) बाळांनो, येतों बरें आता आम्ही ! तुमची आमची हीच अखेरची भेट ! संभाळा; जपून राहा. नीट वागा आा श्रीपांडुरंगाची आज्ञा निरंतर ध्यानीं धरून तदनुसार आपलें रतन ठेवा. म्हणजे श्रीपांडुरंग तुमच्यावर कृपा करकन माताप प्रमाणे तुमचे क्षेम चालवितील !