पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/44

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. रुक्मिणी०- ( सोपानदेवास व मुक्ताबाईस पोटाशी धरून व त्यांचे चुंबन घेऊन आणि शिर ढुंगून ) सोपाना, बाळे मुक्ते, निवृत्तिदादा आणि ज्ञानदेवदादा सांगतील तसं वागून गुण्यागोविंदाने राहा बरं ! बाळा निवृत्ति, वाळा ज्ञानराजा, हीं तुमची भावंडे अजून तुम्हांहून लहान आहेत. यांना अजून चांगलं वाईट कळत नाही. तेव्हा यांना नीट जपा. सदा यांना प्रेमानं जवळ घेत जा. यांनी कधीं हट्ट धरिला तर यांच्यावर रागावत जाऊ नका. गोड बोलून यांची समजूत पाडीत जा. आणि एकमेकांची पाठ धरून आनंदाने राहा. या माझ्या मुक्ताबाईला जीवापलीकडे जपा बरं. पोर अजून लहान आहे. जवळ ये म्हणायला तिला या जगांत आता तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीं. बाळ मुक्ताबाई, दादांच्या आणि भाऊच्या आज्ञेबाहेर कधीं वागू नकोस हो. आणि सोपाना, तू देखील आता चांगली समजूत धरून दादा वागतील तसाच वागत जा. माझ्या लाडक्या निवृत्तिनाथा, आणि माझ्या राजहंसा ज्ञानराजा, मला एकदां कडकडून भेटा ! तुम्हांला पोटाशी घट्ट धरून मला तुमचं एकदां चुंबन घेऊ या ! आणि तुमची ही गोजिरी स्वरूपं मला माझ्या हृदयांत सांठवून घेऊ या ! म्हणजे माझ्या पोटांतील कालवाकालव अंमळ तरी शांत होईल ! ( श्रीनिवृत्तिनाथ व श्रीज्ञानेश्वरमहाराज आईला भेटतात व रुक्मिणीचाई त्यांचे मुख कुरवाळून चुंबन घेऊन शिर ढुंगते. सोपानदेव व मुक्ताबाई विठ्ठलपंतास मिठी मारतात. ) विठ्ठल०-( सोपानदेवाला व मुक्ताबाईला पोटाशी धरून मुस कुरवाळून त्यांचे चुंबन घेऊन व शिर ढुंगून ) बाळा सोपाना, बाळ मुक्ताबाई ! आता सर्वसाक्षी प्रभुच तुम्हांला सांभाळणार ! तुम्ही आपलें सुखदुःख श्रीपांडुरंगचरणीं बाला, आणि त्याचीच सदा करुणा भाका. श्रीपंढरीनाथा, ही माझी सुकुमार बालके तुझ्याच ओटींत घालून आम्हीं आज विदेशी जात आहों ! " तरी हे अनाथनाथा यांचा प्रतिपाळ आतां तूंच कर ! गुरुमहागज, या बालकांना आपला आशीर्वादप्रसाद मिळावा !