पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/45

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ला. ३५ रामानंद- विठ्ठलपंत, श्रीपंढरीनाथाची आज्ञा या बालकांच्या हातून सिद्धीस जाऊन, हे त्रिजगद्वंद्य होतील आणि यांची विमल कीर्ति गगनीं चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत अजरामर राहील हा माझा पूर्ण आशीर्वाद आहे. ( श्रीरामानंदस्वामी निघून जातात. त्यांचे मागून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई निघून जातात. जाता जातां रुक्मिणीबाई वरचेवर मुलांकडे वळून पाहते. ) ज्ञानेश्वर-( रुक्मिणीबाईचे तोंडाकडे पाहून तिला उद्देशून ) आई ग, तू कांहीं काळजी करू नको !! सर्वहासंसारसुखाचाकरीन ॥ आनंदेंभरीनतिन्हीलोक ॥ १ ॥ जाईनर्गमायतयापंढरपूरा ॥ भेटेनमाहेराआपुलिया॥ २ ॥ सर्वसुकृताचेंफळमीचिघेईन ॥ क्षेमहेदेईन परब्रह्मीं ॥ ३ ॥ बापरखुमादेवीवरविठ्ठलेशीभेटी ॥ आपुलेसंवसाटीकरूनिठेला ॥ ४ ॥ ( श्रीज्ञानेश्वरमहाराज वरील अभंग ह्मणत असतां रुक्मिणीबाई त्यांचेकडे सजल नेत्रांनीं पहात उभी राहते; व अभंग ह्मणणे संपल्यावर निघून जाते. तेव्हा सर्व नागरिक श्रीज्ञानेश्वरमहाराज, श्रीनिवृत्तिनाथमहाराज, सोपानदेव व मुक्ताबाई यांच्या गळ्यांत फुलांच्या माळा घालितात व स्त्रिया त्यस पंचारत्यांनी ओंवाळतात व घरून आणलेल्या नानाविध वस्तु त्यांच्यापुढे ठेवून त्यांस साष्टांग नमस्कार घालतात. ) ज्ञानेश्वर०- अहो सुजनहो, तुम्ही आम्हां चौघांना आजपर्यंत पोटच्या पोरांप्रमाणे ममतेने वागविलें तशीच तुमची ममता आम्हांवर अखंड अस्रं या! आमची ओळख ठेवा, आणि आम्हांवरील लोभांत अंतर पडू देऊ नका ! तुम्ही आज आमच्याकरितो फार शिणलां ! गंगेतून आह्मांस पैलउतार नेण्यास नावाडी तयार आहेत तरी नावेत बसण्यापूर्वी तुम्हांपाशीं माझे हात जोडून इतकेच मागणे आहे की, सर्वभूतीं समान दृष्टि ठेवून