पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. प्रवेश पहिला. स्थळ- म्हाळसापूर अथवा निवास ( नेवासे ) क्षेत्र, (गोपाळपंतांचे घर, गोपाळपंत हातांत वीणा व चिपळ्या घेऊन भजन करीत बसले आहेत, असा पडदा उघतो. ) गोपाळपंतश्रीसद्गुरुज्ञानदेव ॥ माझा तयावरी भाव ॥१॥ त्यास मी देहे विकलों ॥ पातां बोधामृत धालों ॥ २ ॥ त्याने दिला मज मंत्र । विठ्ठलनाम पवित्र ॥ ३॥ तचि मी गाईन सदा ॥ मिळवीन हरिपदा ॥ ४ ॥ ( गोपाळपंतांची स्त्री म्हाळसाबाई हातांत फाटके लुगडे व फाटक चोळी घेऊन प्रवेश करते. ) म्हाळसा०- ( लुगडे पुढे करून ) आतां जळूल्या या लकतावळ्या गुंडाळाव्यात तरी कशा !( चोळी पुढे करून) नी या चिंध्या अंगांत घालाव्यात तरी कशा ! ते आपणच सांगा ? पुरेपुरे-पुरे ! पुरे झालं बरं आतां हें भजन ! द्या त्या चिपळ्या टाकून नी अजून तरी वाला प्रपंचांत मन ! बाई आज नाहीं उयां बाढ़ पालटेल, उयां नाही तर परवां तरी कांहीं उमगेल, असं म्हणता म्हणतां आज एक वरीस गेलं ! ना उद्योग, ना धंदा ! ना कुठे जाणं, की कुठे येणं ! एक घर कीं दुसरं पुराण ! आग लागली त्या पुराणाला ! ऐकलं का? प्रपंचाचा झाला एवढा उन्हाळा पुरे झाला बरं ! मेल्यांनो, आज हा डागिना मोड, उद्यां तो मोड, आज हैं भांडं वीक, नी उद्यां तें वीक, असं करकरून सारं घर धुवन टाकलं ! आता बरीक वीख खाईन म्हटलं तर जवळ कांहीं देखील राहिलं नाहीं ! का चार घरं मागून आले तर ते शिजवायला एक भांडे ४