पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/49

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. येऊ त्या सिद्धांचं दर्शन ! मग काय, मी जाऊ ना बाळ्याला घेऊन ? विटाळु द्या नसतं हो म्हटल्यानं तोंड विटाळलं तर ! गोपाळ०- श्रीज्ञानेश्वर सद्गुरूंच्या मुखांतून निघणा-या ज्ञानरूपी धनाचा संग्रह मी आपल्या हृदयसंपुटीं नित्यशः करीत आहे; मग मला आता कशाची वाण आहे ? म्हाळसा०-जळू असलं उफराटं बोलायला कांहीं वाटतं आहे का मनाला ? म्हणे मला आता कशाची वाण आहे ! मग आजपावतर मिळविलेलं धन बाजारांत घेऊन जाऊन, नाहीं कधीं गुंजभर सोनं, की एकादी लुगड्याची घडी, का चिमुटभर दाणे घरांत आणलेत ते ? बाळ्या -आणि बाबा ! मला हो कां नाहीं तर मग अंगांत घालायला आजपर्यंत एक देखील अंगरखा आणलांत ? मी नाहीं अं ! या आमच्या जवळ तो तुमचा पैका; म्हणजे काय ग आई, आपण पुणतांब्याच्या बाजारांतून तुला नेसायला एक छानदार छगई आणि चोळीला एक जरीकांठी खण, बाबांना एक रेशीमकांठी धोतर जोडा आणि मला एक छानदार अंगरखा आणू ? ( आईच्या हातांतून जुने लुमडे व चोळी हिसकून घेऊन व ती फाडून ) ह्या चिंध्या कशाला हव्यात आता आपल्या घरांत ! आणि ( आपल्या अंगांतील फाटका अंगरखा फाडून ) हा जाळीदार अंगरखा तरी काय करायचा आहे मला आतां अंगांत ठेवून!! म्हाळसा--कारटया, (बाळ्याने फाडलेले लुगडे आपल्या हातांत घेऊन त्याजकडे पाहता पाहतां ) जले तुझे एकदांचे हात ते ! आलटून पालटून गुंडाळण्यासारखं एकच पडदणं घरांत होतं त्याच्या अशा चिंध्या करून वाट लावलीस, तो केला आहेस का आपला कुणी काका मला आतां दुसरं लुगडं घेऊन यायला उभा ? नी मेल्या आतां अंगांत रे काय घालशील ? बाळ्या-माझे बाबा असत्नांना ग कशाला हवेत तुला काका नी बिका ? बाबा, या हो तुमची ती बटवी या आईच्या अंगावर फेकून ! म्हाळसा०- मेल्या, कोणी रे तयार करून ठेवली आहे बटबी