पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वर महाराज. भला द्यायला ! ( गोपाळपंतांस ) असा वेदांत सांगून जल्ला हा पोटाची आग शमती तर आजपर्यंत कैक वारा पिऊन वेदांतच घोकीत बसले असते ! तुम्ही अलीकडे तहानभूक, लोकलज्जा, दयामाया, सुखदुःख, सारं कोळन घ्यायलां आहा ! पण मा नाहींना अजून तशी वेदांती, निःसंग, निष्ठर नी धोंडा बनले ! माझा बाळ्या मोठा होईल. नी मग तो मला सुख देईल, ती लांबची गोष्ट ! पण आपण आहां तिथपावतर नको का मला तुमच्यापासून सुख मिळायला ? पण मी असे विचारते की, आजवेरी प्रपंचांत मन घातलंत ते कां तर मग ? तुम्हांलोजर संसाराची गरज नव्हती तर मग लगीन तरी करून घ्यायचे नव्हतंत अगोदर ! म्हणजे तुमच्या मागं लागायला मीही नसते आले वरांत ! ( वाळ्याच्या तोंडावरून हात फिरवून ) नी हे माझं। सोन्यासारखं पोर, चांगलं कुणा श्रीमंताच्या पोटीं तरी जन्माला आलं असतं ! बाळ्या -आई, चल की ग सैंपाकवरांत. मला भूक लागली!! म्हाळसा- भूक लागली तर मी आता आपली हाडं कां देऊ तुला चघळायला १ माग त्यांच्यापाशीच ! त्यांनी गुरूपासून डबोले मिळविले आहेना ? त्यांतलं देतील तुला ते थोडं ! गोपाळ०- श्रीज्ञानेश्वरमहाराज, माझ्या मागची ही उपाधि केव्हां बरें दूर होईल ? । म्हाळसा- बसा आतां जन्मवेरी त्या ज्ञानेश्वराच्या नांवानं रडत ! अगोदर कुठे गेली होती अक्कल मसणांत ? अजून तरी उमगा, नी चला त्या चांगदेव सिद्धांना शरण ! | बाळ्या- आई, मला कांहीं तरी दे ॐ ! म्हाळसा- कारट्या, शेजारच्या रमाकाकूच्याकडे ओ येईसतवर ओघडून आलास, त्याला घटका देखील लोटली नाहीं अजून ! नी इतक्यांत मला भूक लागली ह्मणतोस, तेव्हां तुझ्या पोटांत आतांशी इतकी आग तरी कसली पडली आहे जल्ली ? आतां रात्रीशिवाय कांहीं गिळायला मिळायचं नाहीं. मेल्याला कांहीं करमलं नाहीं कीं भूक ! आता मला खाऊन टाक, झणजे सुटलास एकदांचा !