पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ अंक २ रा. गोपाळ०- ऐकलेंस का मी काय ह्मणतों तें ? म्हाळसा- पुरे ! पुरे झालं तुमचं म्हणणं ! आजवेरां पुष्कळ ऐकलं बरं ! इश्श ! हा कोण पग जला दुराग्रह ! याच चांगदेव सिद्धांचे वरुणगांवचे दोन ब्राह्मण शिष्य ! त्यांची कहाणी ऐकली आहेना लक्ष वेळा लोकांच्या तोंडून ? सिद्धांच्या कृपेनं ते भिक्षाधीशांचे लक्षाधीश झाले ! तसं तुमच्या गुरूंनी केलं आहे का कुणाचं दळिद्र दूर ? उलट माझ्या मामंजींनीं जें कांहीं मिळवून ठेवलं होतं, ते मात्र यांची संगत झाल्यापासून जवळचं नाहींसं होत होत आतां अखेर हातीं चौपदरी घेण्याची वेळ आली ! रेड्याच्या तोंडून वेद बोलवले ! मेलेली माणसं स्वर्गातन श्रद्धाला आणली ! झालं ! इतकंच ना सारं ? पण चांगदेव सिद्धांच्यापुढे वरुणगांवच्या दोन ब्राह्मणांनी मृत्तिकालिंगाच्या बदली वाळूवर बाटी ठेवून पार्थिवलिंग ह्मणून पूजेला दिली, तों आपले सिद्धांच्या भक्तिस्तव प्रत्यक्ष श्रीशंकर त्या वाटींत प्रगट झाले ! तेव्हां चांगदेव सिद्धांनी तिथे श्रीशंकराचे देऊळ बांधून त्यांचं नांव वटेश्वर ठेवलं ! असं सामर्थ्य आहे का तुमच्या गुरुंच्या अंगीं ? वटेश्वरासारखं जागृत नी कडकडीत स्थान सा-या पृथ्वींत नाहीं, म्हणून चोहों देशांतली माणसं येत आहेत त्यांच्या दर्शनाला ! चांगदेव सिद्धांचं राहिलं, पण वटेश्वरांचं दर्शन घेतल्यानं तर नाहींना पाप लागायचं ? मग ते तरी घडू या एकदां ! वटेश्वरांच्याटू मूठभर तांदूळ ठेविले तर ताटभर द्रव्य देतात हो ते ! गोपाळ०- श्रीज्ञानेश्वर सद्रु, साक्षात् श्रीविष्णु मला मिळाल्यावर अन्य देवता मला काय अधिक देणार ? म्हाळसा०- जे आमच्याजवळ नाहीं तें देणार बरं का ! नको, नको, नको ! जङ्का, हा वितंडवाद घालता घालतां माझा घसा अगदी कोरडा पडला ! बाळ्या -आई, ए आई, परवां नरोबांनी आपल्या भाऊला नेला होता बरोबर पुणतांब्याला ! आई, तेव्हा भाऊ सांगत होता की, बुवांच्या पुढे बरफीचे आणि पेढ्यांचे डोंगराएवढे ढीग पडतात म्हणून ! आणि किनई ग आई, त्यांचे चौदाशें शिष्य आहेत ! ०