पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. त्यांना कि नई ते बुवा पंचपक्वा ने खायला देतात ग ! आई, चल ग आपण पुणतांब्यालाच जाऊन राहूं. मग काय बरफी आणि पेढे ! आणि लाडू ! चंगळच चंगळ! पुणतांब्याला गेल्यावर मला हातांत घालायला सोन्याची कडीं, अणि गळ्यांत घालायला मोठा आठपदरी गोफ करायचा बरे का आई ! | म्हाळसा०- बाळा, जाऊं बरं आपण ! राजापासून तों रंकापर्यंत जे सगळे त्या सिद्धांच्या पायांवर लोटांगण घेत आहेत ते का सारेच का वेडे ! वैदिक, याज्ञिक, शास्त्री, पंडित, त्यांच्यापाशीं शिकायला लोटले आहेत ते देखील का खुळेच ! वाघावर बसून हातांत सापाचा चाबूक घेऊन आकाशांतून अधांतरीं जायचं ! आतां इथे गुर व्हायचं नी क्षणांत पांचशें कोसांवर भक्तांना दर्शन द्यायचं ! हातांत माती घेऊन तिचं सोनं करायचं ! मेलेली माणसं जिवंत करायची ! लोकांचे रोग बरे करायचे ! जें कुणी मागेऊ ते त्याला यायचं ! असे हे चौदा विद्या नी चौसष्ट कळा शिकलेले नी चौदाशे वर्स वाचलेले सिद्ध, देवादिकांच्या हातून होणार नाहीत असे अघटित चमत्कार करून जगाला दाखवीत आहेत ! नी ह्मणूनच वाराणशींतल्या पंडितांनी यांचं जगद्गुरु असं नांव ठेविलं आहे ! |बाळ्या-आई ग, चाट्यांचा भाऊ सांगत होता की, त्या बुवांचे शिष्य देखील किनई मोठी गंमत करितात ह्मणून ! आई, कोणी किनई झाडालाच टांगून घेतात ! कोणी एकाच पायावर आणि एकच हात वर करून उभे राहतात ! कोणी गळ्यापर्यंत पुरूनच घेतात ! एक शिष्य आपला घार होऊन आभाळांत उडून गेलेलाच भाऊने पाहिला ग ! एक तर डोक्यानेच चालत होता ! एकाला पाण्यावर चालतांना त्याने पाहिला ! आणि एक तर डोंगरावरून आपला उभाच्या उभा खाली आला ! आणि पुन्हा उभाच्या उभाच डोंगरावर चढून गेला ! आई, मी होऊ ग त्यांचा शिष्य ? मी त्यांचा शिष्य झालो झणजे वाटेल तिकडे जाऊन तू काय म्हणशील ते तुला आणून देईन ! मग तुला काय कमी ! साया पृथ्वीतले जिन्नस आपलेच ! आई,