पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/56

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ४६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. पाडा ! बाई, ब्रह्मलिखित कधी कुणाला टळलं आहे का ? दैवांत जसं जसं असेल तसं तसं व्हायचंच ! नाहीं तर बाबांचं आज वय का झालं होतं ? एकाएकींच वाला पडला. त्याला कोण काय करणार ? आता तुम्हीं पुष्कळ खेद केला, तरी काय उपयोग ? विवेकानं अंवढा गिळलाच पाहिजे ! सावित्री०- ( तळहातावरील अग्नि खाली ठेवून ) कृष्णाबाई, यांच्या आज्ञेखेरीज मी आजवेरी यांच्यापुढे बसलें नाहीं. कधी यांची अवज्ञा केली नाही. यांच्या निरोपावांचून कुठे गेले नाहीं. हे जेवल्याखेरीज कधी तोंडांत बांस घातला नाही. हे निजल्यावांचून कधी अंग टाकलं नाही. यांच्या आधीं उठून, अंग धुवन, देवातुळशीची पूजा करून यांचं चरणतीर्थ घ्यायला एक दिवस विसरले नाही. हे कधी रागावले तर उलट उत्तर केलं नाहीं. उलट यांचे पाय धरून यांच्यापुढं सदा नाक घासलं. हे बाहेरून घरांत आले तर नेहमी हसतमुख़ानं यांच्यापुढे जाऊन हात जोडून यांची आज्ञा पुसली. यांच्या मनींबाहेर कधी वागले नाहीं. यांनी संतोषानं सांगितल्याखेरीज कधी व्रतउपास का नेमधर्म का कांहीं केलं नाहीं. कधी परपुरुषाशी बोलले नाहीं का डोळा वर उचलून कुणाकडे पाहिलं नाहीं. नव-यांना निंदणा-या बायकांत कधी बसलें नाहीं का कधी वाईटाची संगत धरली नाही. यांनी दिलं तें नेसले नी घातलं ते खाल्लं नी सांगितलं ते केलं. हट्टानं कधीं हैं। पाहिजे की ते पाहिजे असं झटलं नाहीं. का यांच्यापुढे कधी कपाळाला आठ्या घालून दुर्मुखलेली बसले नाही. यांना पुसल्याखेरीज कधी आपलीच बुद्धि चालवून अवचरपणानं वागले नाहीं. हे साक्षात् लक्ष्मीनारायण असं समजून यांची एकनिष्ठेनें सेवा केली, नी पतिव्रता धर्मानं वागले. तेव्हां यांची सेवा मला अशीच निरंतर घडावी ह्मणून वैकुंठाहून माझ्या आईबापांनी, यांना बरोबर घेऊन यायला, मला बोलावणं पाठविलं आहे ! म्हणन किनई यांना बरोबर घेऊन मी आतां माझ्या माहेराला जाते ! माझ्या धर्माच्या मायबहिणींनो माझी ओटी भरा ! मला हळदकुंकू या ! नी माझी माहेराला पाठबणी करा !