पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ४७ राधा-माई ! अखेर तू जाणार ना, या तुझ्या ताईला मागं टाकून ? माई ! नकोग अशी निष्ठुर होऊ ! ( सावित्रीबाईच्या गवास मिठी मारून व तिचे मुख कुरवाळून ) माई ! तुझं शरीर विस्तवांत पळतांना आम्हांला कसं ग पावेल ? अग, आत्महत्या हा शास्त्रांत मोठा दोष गणला आहे ! तर आपलाच हेका चालवून पातकांच्या राशी कां बरं डोक्यावर घेतेस ? अभिमन्यूची बायको उत्तरा, हिला सहगमन करूं नकोस म्हणून श्रीकृष्णभगवंतांनी केलेला उपदेश आहेना तुझ्या ध्यानांत ? अग, साधुसंत देखील या सहगमनाला घोरपाप म्हणतात ! म्हणून म्हणते कीं, इतकी सगळी माणसं तुला जीव तोडून सांगत आहेत, त्यांचा शब्द मोडून नको ग असा हट्ट धरून आपलंच खरं करुं ! बाबा गेले, म्हणून आम्ही नाहीं का त्यांच्या मागं तुझी कुणी ? आई, बाबा, मी, भाऊ, सारीच का तुला परकी झालों ? माई, अग माई, अखेरीला तरी नीट दोन गोड शब्द बोल ग माझ्याशी ! सावित्री०- ताई, यांच्याखेरीज सा-या जगांत मला दुसरं कांहीं तरी प्रिय आहे का ? “तूच सांग बरं ? अग, यांच्याखेरीज मला राजाचं राजपद जरी मिळालं तरी त्याचं मला यत्किंचित् देखील सुख नाहीं ! हे माझे धनी, माझे सुखदुःखाचे वाटेकरी, नी हेच माझे मुख्य दैवत, हे खरं ना ? मग हे जिथं जातील तिथं यांच्याबरोबर जाऊन यांची मनोभावानं नको का मला सेवा करायला ? अग यांची सेवा हाच ना माझा धर्म ? मग हे स्वर्गी गेल्यावर यांच्या मागं मला तू इथेच राहा असं कसं बरं सांगतेस ? ताई, क्षणभर ही लटकी माया दूर लोटून, ते बघ, वैकुंठांतलं विमान मला स्वर्गीत न्यायला खाली उतरत आहे ! त्यांत मला बसवून माझी देवाच्या घरी बोळवण कर ! हेच तुझ्यापाशीं माझं अखेरचं मागणं आहे ! सखुबाई- राधाबाई, सावित्रीबाईंना माई, माई, म्हणून नका नसत्या मोहांत पाडू. त्या आपलं सोनं करून घेऊन जात आहेत ! यांना कां बरं आडवतां ? सासरची बेचाळीस नी माहेरची बेचाळीस उद्धरायची आहेत कुणाच्या प्रारब्धी ? नी मेलं कपाळच