पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ૪૧ ही नेहमी अंगावर घालीत जा हो ! घालालना ? ( त्या मानेने हो म्हणून सुचवितःत. ) सखु०- ( मनाशी ) आई जगदंबे, या पतिव्रतेनं भरलेली ही माझी ओटी, मला शुभशकुनाची होवो ! नी तिकडच्यापूर्वी माझे डोळे मिटीव, हेच तुझ्यापाशीं माझं पदर पसरून मागणं आहे ! | रमा०- ( मनाशी ) म्हाळसाई, सतीच्या कुंकवानं भरलेल्या या माझ्या मळवटा नंच मला आपल्या पायांपाशी घेऊन जा, हीच माझी तुला प्रार्थना आहे ! | गंगा०- ( मनाशी ) देवा, मी आज सतीचं वाण घेतलं आहे, तेव्हा माझ्या अंतकाळी माझ्या हातून सवाष्णींना असंच वाण वांटलं जावो, हेच माझं तुझ्या पायांजवळ मागणं आहे ! रखमा०-( मनाशी ) हे मोहनराजा, सताने भरलेल्या या माझ्या सौभाग्य-ओटीनंच मला आपल्या पायांपाशीं ने ! याहून आणीक तुझ्याजवळ मला कांहीं मागायचं नाहीं ! सावित्री०- बायांनो, येते बरं आतां मी ! मी तुह्मांला कधी चुकून उणं उत्तर बोलले असले, तर त्याची तुह्मी मला क्षमा करा नी मजवरच्या लोभांत अंतर पडू देऊ नका ! ( लांच पाहिलेसे दाखवून) ताई, ते पाहा सद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराज नित्य : नेमाप्रमाणं गंगास्नान करून श्रीमोहनीराजांच्या दर्शनाकरिता इकडून जात आहेत ! तर तिथवर जाऊन मी आतां त्यांचं शेवटचं दर्शन घेते ! झणजे आदल्या जन्मीचं कांहीं पाप माझ्या गांठीं अजून शिल्लक राहिलं असलं, तर ते त्या सत्पुरुषांच्या दर्श नानं जळन जाईल! नी मला स्वर्गाची वाट सुखानं चढतां येईल! ( श्र ज्ञानेश्वरमहाराज हरिपाठ झणत प्रवेश करतात. ) ज्ञानेश्वरनित्य सत्यामित्यहरिपाठज्यासी ।। कळिकाळत्यासीन पाहेदृष्टीं ।। १॥ रामकृष्णउच्चारअनंतराशीतप ।। पापाचे रेकळपपळतीपुढे ।। २ ।। हारहरिहरीहामंत्रशिवाचा ॥ ह्मणतीजेबाचातयांमोक्ष ॥ ३॥ ज्ञानदेवह्मणेनारायण नाम ।। पावीजेउत्तमनिजस्थान ॥ ४ ॥