पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/6

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ प्रस्तावना. श्रीविष्णुसा न तारी जन काय ज्ञानदेव वेगाने ?। हा दे ते स्वर्गाच्या जनका यज्ञा न देववे गानें ॥ ९ ॥ ज्ञानेशा ! भगवंता ! भगवज्जनवल्लभा ! महासया ! । कलियुगवर्ती जन जो, देशी स्मरणेंचि, मुक्तिचें पद या ॥ २ ॥ त्वन्नाम महामंत्र ज्ञानप्रद होय; यासि जो भावें । जपतो, ज्ञान तयाचे, त्या जनकाचे तसेंचि शोभावें ॥ ३ ॥ कोणा जड़ा न होशील सुगतिप्रद जाहलासि भिंतीते । श्रीरामाचे तसे, तव यश स जनसमाज चिंती ते ॥ ४ ॥ ज्ञानेशा ! जें जाड्य त्वत्तेजें क्षिप्र ते विरे; डाजो । खळमानस प्रताप; श्रुति वदला विप्न तैवि रेडा जो ॥ ३॥ श्रीमद्भगवद्गीता व्याख्या केली जगासि ताराया। सारा या सद्ग्रंथा सेविति संसारताप साराया ॥६॥ मोरोपंत. उभारिलाध्वजातिहाँलोकांवरी ॥ ऐसीचराचरीकीर्तिज्याची ॥ १ ॥ तेहेनिवृत्तिनाथज्ञानेश्वरसापान ॥ मुक्ताबाईज्ञानदाप्तिकळा ॥२॥ धरुनीसगुणरूपॅकेलीक्रीडा ॥ बोलविलारेडानिगमवाक्यें ॥ ३ ॥ वरीवैसवृनीचालविलीभिती ॥ चांगदेवाप्रतीभेटीदिली ।। ४ ।। मगवासकेलाअलंकापरासी ॥ पिंपळद्वाराशक्रिनकाचा ॥ ६॥ निळाह्मणेज्यांच्यानाकरिताचा ।। नातळती दोषकळिकाळाचे ॥ ६ ॥ ज्ञानेशोभगवान्विष्णुर्निवृत्तिर्भगवान्हरः ॥ सोपानोभगवान्त्र निळोबाराय. ह्मा मुक्ताख्याब्रह्मणःकला ॥ १ ॥ निरंजन कवि. याप्रमाणे भगवान् श्रीविष्णूनी सहाशे वर्षांपूर्वी या आर्यावर्तीत ज्या रूपाने अवतार धारण केला होता व ज्या श्रीविष्णुस्वरूप श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या महतीचे पोवाडे, श्रीनामदेव व जनाबाई, ह्यांच्यासारख्या तत्कालीन अनेक श्रेष्ठ वैष्णवांनी, श्रीएकनाथ व श्रीतुकाराम यांच्यासारख्या त्यांच्या मागून, भगवद्भक्तिमार्गाचा प्रसार करण्याकरितां, या आर्यावर्त्तत अवतीर्ण झालेल्या महान् संतांनी, श्रीधर, महीपति ह्यांच्यासारख्या प्रासादिक चरित्रकारांनी, मोरोपंतासारख्या कविवर्यांनी आणि निळोबाराय, निरंजनमाधव ह्यांच्यासारख्या अगदी अलीकडील भगवद्भक्तांनी गाईले आहेत, अशा परात्पर जगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा धन्यवाद् म्यां पामराने आणि त्यांच्या दासानु दासाने कोठवर गावा ?