पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. सावित्री०- ( पुढे होऊन श्रीज्ञानेश्वरमहाराजांस नमस्कार करते. ते तिला ‘सौभाग्यवती भव ? असा आशीर्वाद देतात. ती पुन्हा नमस्कार करते, तेव्हां ते तिला ' पुत्रवती भव ' असा आशीर्वाद देतात. श्रीसद्गुरुमुख'तून निघालेले हे आशीर्वाद ऐकून ती गहिवरून कंठ दाटून येऊन, सजलनेत्रांनी खाली पाहात उभी राहते.) ज्ञानेश्वर- मातोश्री, साक्षात् अरुंधती, सावित्री, लोपामुद्रासतीसारखी दिसणारी तूं महापतित्रता कोण आहेस ? आणि माझा आशीर्वाद ऐकून तू सजल नेत्रांनी खालीं पाहात का उभी राहिलीस ते सांग बरें ? कृष्णभट- ( पुढे होऊन, श्रीज्ञानेश्वरमहाराजांस नमस्कार घालून ) श्रीसद्गुरुनाथा, या बाईचे नांव सावित्रीबाई. ही सतीचे वाण घेऊन आपल्या पतीच्या प्रेताबरोबर सहगमन करण्याकरिता सिद्ध झाली आहे ! आणि आह्मी सर्व प्रवरा तीरापर्यंत हिची बोळवण करण्याकरिता येथे जमलों आहों ! हिचा पति पंचत्व पावन निजधामास गेला असतां सद्गुरू मुखांतून शुभ आशीवचनोक्ति निवालेली ऐकून, हिला गहिवर येऊन, कंठ दाटून आल्यामुळे समर्थांपुढे ही सजल नेवांनी दृष्टि खाली करून उभी राहिली आहे ! | सोमेश्वर दीक्षित- अहो श्रीसद्गुरुनाथा, आपण साक्षात् भगवान आहा ! भूतमात्रांवर दया करणे समर्थांचे ब्रीद आहे ! आणि भक्तजनांचा उद्धार करण्याकरितांच समर्थांनी अवतार घेतला आहे ! समर्थांनी या निवासक्षेत्री वास्तव्य केल्या दिवसापासून आजपर्यंत श्रीसमर्थदर्शनास दूरदूरचे भावीकजन लोटां: गणी येत आहेत ! आणि त्या सर्वांना समर्थांनी आपल्या कृपादृष्टीने भवव्याधीपासून मुक्त केले आहे ! जगद्गुरूंनी अंधांस नेत्र दिले आहेत ! पांगळ्यांना पाय दिले आहेत ! थोट्यांना हात दिले आहेत ! मुक्यांना वाचा दिली आहे ! बधिरांना कर्ण दिले आहेत ! वांझेला पुत्र दिले आहेत !" रोग्यांना आरोग्य दिले आहे ! अज्ञानांना ज्ञान दिले आहे ! दरिद्यांना धन दिले आहे ! ऐश्वर्यहीनांना ऐश्वर्य दिले आहे !