पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/61

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ अंक २ रा. अनेकांना वांच्छित वस्तु दिल्या आहेत ! आणि दुर्बळांना बळ दिले आहे ! ह्मणून सद्गुरुचरणीं आह्मां सर्वांची अनन्यभावाने हीच प्रार्थना आहे कीं, दीनदयाळ, भक्तवत्सल समर्थांनी या बाईवर कृपेची पाखर घालून सद्रुमुखांतून निघालेल्या मंगल आशीर्वादाप्रमाणे या बाईचे सौभाग्य अखंड कायम राखावें । सावित्री०-सद्गुरुमहाराज! श्रीह्माळसा अंबाबाईने माझ्या स्वमांत येऊन माझी खणानारळांनी ओटी भरली नी माझ्या कपाळी कुंकू लावलं, तेव्हा ही शुभशकुनाची गाठ पदराला बांधून मी देवीआईवर विश्वास ठेवून (पतीच्या शवाकडे बोट दाखवून ) यांना बरं वाटेल अशी बळकट आशा धरून बसले होते ! श्रीमोहनीराजांनी देखील स्वप्नांत येऊन, मुली, तुझं सौभाग्य उदंड राहील, तू काळजी करूं नको, असं मला अभय दिलं ! पण ज्यांच्यावर विश्वास धरून मी बसले होते त्यांनीच अवेर या दोन गाईचा गळा कापला! तेव्हा त्यांची कीर्ति घेऊन मी बैकुंठास आपल्या माहेराला जात आहे ! तरी सद्गुरूंनी आपला झपाहस्त माझ्या मस्तकावर ठेवावा म्हणजे सद्गुरुकृपेने मी माझ्या आईबापांच्या घरी सुखरूप जाऊन पोहोंचेन ! (श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरणांस मिठी मारते.) राधा०- ( पुढे होऊन) अहो सद्गुरुसमर्था, माझ्या माईचं या जन्मीं कधीं अकून देखील पापमार्गी पाऊल पडलं नाहीं ! पण तिचं पर्वकर्म पुढे येऊन उभं राहिलं नी त्यानं साधला हा असा दावा ! मागच्या जन्मीं हिनं हरिकीर्तनाचा रंग मोडला. का कुणाचं घर बुडविलं, का धेनुवत्साची ताटातूट केली, का पंक्तिभेद केला, का संतांचा द्वेष केला, का देवाची पूजा लाथेनं झुगारली, का कुणाच्या तोंडचा घांस काढला, का कुणाला पाटावरून जेवतांना उठवलं, का कुणाच्या संसाराचा घातपात केला, का देवपजा मध्येच सोडली, का देवऋषींना निंदलं, का कुळदेवतांची आराधना विसरली, तो देवानं त्याचा हिला या जन्मीं असा दंड केला ! सद्गुरुनाथमहाराज, तुह्मी शरणागतांचे आधार आहाँ पाणन माझ्या माईनं अनन्यभावानं सद्गुरुचरण धरले आहेत, तरी सद्गुरूंनीं हिचा उद्धार करावा !