पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. ज्ञानेश्वर-( सावित्रीबाईस ) मातोश्री ऊठ. हरिचरण चित्त जडले असतां, भवभय समूळ नष्ट होते आणि अंती चिन्मयपदाची जोड मिळते, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे ! संसारीक ज्याप्रमाणे रात्रंदिवस आपले प्रापंचिक हित साधण्याकरितां झटतात, तशा प्रीतियुक्त अंतःकरणाने जर प्राणी हरिभजनीं रत होतील, तर त्यांना यमाचे बंधन कालत्रयींही होणार नाहीं ! अर्थप्राप्तीकरितां धनहीन लोक भाग्यवंतांची जशी स्तुति करितात, त्याप्रमाणे भक्तियुक्त अंतःकरणाने प्राणी आपले चित्त हरिचरणीं ठेवतील, तर ते काळालाही दंड करतील ! असे प्रभूचे सांगणे आहे. श्रीहरीवर भरंवसा ठेवून तू पतिव्रताधमान वागली आहेस, तेव्हां तो करुणासिंधु दीनवत्सल प्रभु, तुला कसा विसरेल ? ( अंगणांत येऊन ) जनहा, पंचत्व पावलेल्या हिच्या पतीचें नांव काय ? गोविंदपंत- गुरुमहाराज, यांना सच्चिदानंदबाबा ह्मणतात. ज्ञानेश्वर-( ओटीवर चढून सच्चिदानंदवावांच्या प्रेताजवळ जाऊन ) काय ? सच्चिदानंद ! जनहे, सर्वोपाधिबाह्य जें सत्, चित्, आनंद, त्याला कधी कोठे मृत्यु ऐकला आहे काय ? हा तर आनंदमय सत्य आत्मा असून तो अविनाशी आहे ! तुम्ही केवळ मायेने भुलून त्याला मृत्यूची उपाधि लावीत अ हां ! शस्त्रादिकांना छेद न पावणारा, जलप्रलयाने न बुडणारा, अग्नीने न जळणारा, असा हा सच्चिदानंद नित्य, अचल, शाश्वत आणि सर्वत्र सर्घव्यापक असून त्याच्या ठिकाणी मृत्यु ही अक्षरे कशीं संभवताले ! आणि अशा सच्चिदानंदाला मृत्यु आला अशी खोटीच कल्पना करून येऊन, तुम्ही आतां याला दोन्यांनी बांधून स्मशानांत नेणार काय ? आणि तेथे याला अग्नींत लोटून तुम्ही याची राखंडी करणार काय ? जनहो, केवढा हा तुमचा वेडेपणा ! ( सच्चिदानंद बाबांचे अंगावरून हात फिरवून ) अहो. सच्चिदानंद ! निद्रेचा त्याग करून जागृति धरा ! उठा, आणि आह्मांला प्रेमालिंगन या ! ( सच्चिदानंदबाबा झोपेतून जागे झाल्याप्रमाणे अंगाला अळोकेपिळोके देत उठून बसतात; व श्रीज्ञानेश्वरमहाराजांस पाहून त्यांचे