पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/63

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ अंक २ रा. पाच घट्ट धरतात. हा अद्भुत चमत्कार पाहून सावित्रीबाई देहभान विसरून जाते. सर्व मंडळी श्रीज्ञानेश्वरमहाराजांपुढे लोटांगण घालतात. सच्चिदानंद- ( श्र ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायांवर लोळून ) अहो योगःश्रेष्ठा ! यमदूत माझ्या गळ्यांत पाश टाकून मला बांधन नेत होते ! परंतु सद्गुरूंना पाहून ते भिऊन पळाले! आणि सद्गुरूंच्या कृपाकटाक्षाने माझा मृत्युपाश निमिषार्धात तुटून गेला! अहो समर्था ! मी अनंत जन्म अज्ञानरूपी महासर्पाने ग्रासलों आहे ! आणि दुर्ब द्वीने वागून पापराशीत बुडालो आहे ! यावेळी मी सद्गुरुचरणीं अनन्यगात शरण रिवालों आहे, तरी अहो ज्ञानराया, या किंकराला जन्ममरणापासून मुक्त करून याचा उद्धार करावा ! | सावित्री०- (देहावर येऊन श्रीज्ञ नेश्वरमहाराजांचे पायांवर डोके ठेवून ) श्रीसद्गुरूंनी काळाच्या तोंडांत मारून ( उठून सचिदानंदबाबांस मिठी मारून ) यांना परत घेऊन येऊन या आपल्या लेकीला आज चडेदान दिलं ! त्यायोगानं मी धन्य झालें ! गुरु महाराज, मी आपले किती उपकार मानू ? मी आपल्याला काय देऊ ! आपली ही आनंदमूर्ति मी आपल्या हृदयांत कुठे सांठवू? नी सद्गुरुचरणांवर मी आपल्या आनंदाश्रून किती अभिषेक करूं ? श्रीसद्गुरूंचा महिमा मी आपल्या एका मुखानं कुठवर वर्णन करूं ? सद्गुरूंचा धन्यवाद मी कोणत्या शब्दांनी गाऊँ ? नी सद्गुरुंची मी कोणत्या उपायानं उतराई होऊ ? यावेळी मी अत्यानंदानं अगदी वेडी झाले आहे नी त्यामुळे मला काहीच सुचेनासं झालं आहे ! | ज्ञानेश्वर- मातोश्री, हे तुझ्याच कडक पातिव्रत्याचे फळ तुला श्रीविठ्ठलाने प्रसन्न होऊन दिले आहे ! मी यःकश्चिन कोण ! आणि मी ते काय करणार ? श्रीपांडुरंगाचा वरदहस्त तुह्मां उभयतांवर आहे ! प्रभुकृपेने तुम्ही सदैव अखंड सुखांत नांदाल आणि इहलोकीं धन्य होऊन अंत निरंतर ईशचरणीं वास कराल ! हा तुह्मांला माझा पूर्ण आशीर्वाद आहे ! | सच्चिदानंद- अहो जगद्गुरु ज्ञानदेवसमर्था, या दीनदासावर अनुग्रह करा ! आणि या मायिक संसारांतून मला मुक्त करून