पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/64

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ श्वरमहाराज. माझा उद्धार करा ! ही सद्गुरुमूर्ति आज डोळे भरून पाहिल्याने मी कृतार्थ झालो आहे ! तरी अहो कृपासागरा, तुमचे परम मंगलनाम या माझ्या हृदयफलकावर लिहून ही माझी अमंगल काया पुनीत करावी ! माझे मन सदा सद्गुरुचरणीं जडेल अशी सद्बुद्धि आपल्या सुवोधाने माझ्या अंतःकरणांत उत्पन्न करावी ! आणि अशा रितीने आपल्या नांवाने मुद्रांकित झालेली ही माझी काया, आणि आपल्या सद्धोधानें शुद्ध झालेली ही माझी बुाद्ध निरंतर सद्गुरुसेवेला लावून घ्यावी ! ज्ञानेश्वर- सच्चिदानंदवावा, तुमची अशीच इच्छा आहे तर सांप्रत श्रीमद्भगवद्गीतेवर भावार्थदीपिका नांवाची टीका मी महाठी भाषेत लिहीत आहे; तो ग्रंथ तुह्मी मजजवळ बसून परोपकारार्थ प्रसिद्धीकरितां लिहावा. झणजे भगवंतांच्या अनुग्रहाने तुह्मी साक्षात् ब्रह्मस्वरूप होऊन या भूतलावर चिरंजीव व्हाल ! सच्चिदानंद- सद्गुरूंची आज्ञा या दासाला प्रमाण आहे ! ( सर्व मंडळी ताटांत पंचारती घेऊन ती श्रीज्ञानेश्वरमहाराजांस प्रदक्षिणापूर्वक ओवाळतात व खालील आरती म्हणतात. ) आरती ज्ञान राया। केली सजीव काया । अगाध तव लीला । तारि सद्गुरुराया ॥ १ ॥ पशुसी वेदवाणी। दिधली प्रतिष्ठानीं । पितरां श्राद्धदिनीं । आणिले स्वगहूनी ॥ २ ॥ मोक्षाचे भांडागार । जाणती भक्तनर। अवतार श्रीविष्णु । नांव त्या ज्ञानेश्वर ॥ ३ ॥ हो उदित सदवृत्ति । ईश्वरी पूर्ण भक्ति । जडो अखंड चित्तीं। चरण ही विज्ञप्ति ॥ ४ ॥ अज्ञान अहंकार । है नाशिती शरीर । अनंत जन्मकोटी । पुरे ही येरझार॥५॥ दुस्तर भवोदधी। जलचर ह्या व्याधी । तोडिती बहू आह्मां । सोडवी कृपानिधी ॥ ६॥ श्रमलों ज्ञानदेवा । तू परब्रह्म ठेवा । सभाग्ये भेटलासी । धरुनी दृढभावा । ॥ ७ ।। तुझ्या चरणीं माथा । ठेविला गुरुनाथा ।। पाजुनी ज्ञानामृता । उद्धरी दीनानाथा ॥ ८ ॥ ( वरील आरती संपली झणजे पडदा पडतो. )