पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. न्प्राणोन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥ २ ॥ ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या ।। आत्मरूपा ॥ १ ॥ नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥ नमो जगदखिलपालना । मंगळमणानिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३॥ जयजय देव निर्मळ॥ निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ ४ ॥ जयजय देव प्रबळ । विदाळतासंगळकुळ । निगमागमद्मफळ । फलप्रद ॥ ५॥ जयांचें केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तोच वर्दू चरण । श्रीगुरूचे ॥ ६ ॥ जयांचेाने आठवें । शब्दसृष्टी आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ ७ ॥ वक्तृत्व गोडपणे । अमृतातें पारुष ह्मणे । रस होती वोळगणे । अक्षरांसी ॥ ८ ॥ बापहो, श्रीहरीचे अत्युद्भूत आणि अदृष्टपूर्व असे जे विश्वरूप त्या विश्वरूपाचे संजयाला स्मरण होऊन त्याला आनंद आवरेनासा झाला; आणि तो सद्गदित अंतःकरण होत्साता, मुखाने वारंवार श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे ह्मणू लागला. परंतु प्रभूचे महत्व पुत्रप्रेमाने मोहित झालेल्या राजा धृतराष्ट्राला कोठले कळणार ! संजयाची ही स्थिति राजा धृतराष्ट्राला चमत्कारिक बाटली आणि तो झणू लागला की, हे संजया, ही तुझी तहा कोठली ? तुला येथे श्रीव्यासांनी कोणत्या उद्देशाने बसविले आहे ? आणि तू हा अप्रासंगिक भलतीच काय बडबड चालविली आहेस ? तर संजया, मला हे सांग कीं, कुरुक्षेत्री माझे आणि पंडूचे पुत्र यांच्यामध्यें जें युद्ध सुरू झाले आहे, त्यांत अखेर विजयश्री कोणाला माळ घालणार ? माझ्या दुर्योधनालाच विजय प्राप्त होणार असा माझा तर्क होत आहे; तर शुद्रों वोतिष के कार्य आई हैं मक्का कथन केर. असा प्रश्न काल राजा धतराष्ट्राने संजयाला केला. त्या प्रश्नाचे जे उत्तर संजयांनी राजा धृतराष्ट्राला दिलें त्याचेच महाराज मी आज निरूपण करणार आहे. महाराज, ।