पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/67

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ५७ अनंत जे वेद, त्या वेदांपासून सव्वा लक्ष भारत निर्माण झाले. सातशे लोकांची गीता या सव्वालक्ष भारताचे सर्वस्व होय. आणि संजयांचा पूर्णोद्वार हा जो आजचा शेवटचा श्लोक हा सातशें श्लोक गीतेचा इत्यर्थ होय. संजयांच्या या एका वचनाचाच आश्रय केला असतां सकल अज्ञान नष्ट होईल. परंतु संजयाच्या अशा या सर्वश्रेष्ठ वचनाचे आज अखेरचे निरूपण करण्यापूर्वी, महाराज, भगवंतांनी आपल्या प्राणप्रिय अशा अर्जुन भक्ताला सर्व गुह्यांतील अत्यंत श्रेष्ठ असे जे गुह्य सांगितले आहे ते भगवंतांचे गुह्यवचन तात्पर्याथने, महाराज, मी पुन्हा तुमचे कानांवर घालीत आहे; तर भगवंतांच्या या वचनाकडे तुह्मी सर्वांनी अवधान यावे आणि भगवंतांचे हे वचन निरंतर ध्यानीं धरून तदनुरूप तुह्मी सर्वडो वर्तावें हेंच तुह्मांजवळ माझे पुन्हा पुन्हा मागणे आहे. कारण भगवंतांच्या या वचनाप्रमाणे तुह्मी वागला असतां तुह्मी ज्ञानसंपन्न होत्साते अभंग आणि नित्य असें जें मोक्षपद त्या मोक्षपदाप्रत जाल. भगवंत झणतात, अर्जुना, तुला माझे हेच सांगणे आहे की, मन्मना भव मद्भक्तो मद्यार्जी मां नमस्कुरु ।। मामेवैष्यास सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ देव म्हणतात, वा अर्जुना, तू माझा फार लाडका, म्हणून सागततरि बावा आणि अंतरा। आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकाते वीरा । विषय करीं ॥ कीं सर्व व्यापक जो मी, त्या मला तू आपल्या सर्व व्यापारांचा विषय कर. ब्रह्मदेवापासून तों मुंगीपर्यंत माझ्यावांचून दुसरी गोष्टच नाहीं, असे निःशंक ज्ञानाने जाणून आणि माझी श्रीकृष्णमूर्ति चराचर भगवटूपच आहे असे अभेद दृष्टीने ओळवून अव्यक्तोपासक चित्ताने माझी भक्ति कर.. जो मजाच एकालागीं । कमें र वाहतसे आंगीं । जया मजवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ दृष्टादृच्च शकलं । जयाचे मुरी छे । जैथे जिम्चे फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ज्याला जगामध्ये मजव्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाहीं; ज्याचे शुभ अथवा अशुभ हे सारें