पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. मीच; आणि जो आपल्या जन्माचे सार्थक काय ते एक मी भगवानच असे समजतो आणि अशा रितीने ज्यांचे कायेचे, मनाचे आणि बुद्धीचे सर्व व्यापार ईश्वरार्पण झालेले आहेत, जे वाणीने ईशगुणानुवाद वर्णन करितात, कानांनी ईश्वरकीर्तन श्रवण करितात, नेत्रांनी ईश्वराला पाहतात आणि मुखाने ईशनाम गातात, जे सदैव परमेश्वरप्राप्तीचा संकल्प मनांत बाळगितात, असे जे माझे भक्त ते अधमाहूनही अधम् अशा पापयोनीत जरी जन्मलेले असले किंवा मुढ असले, तरी त्यांना मी माझे कलत्र समजतों; आणि त्यांना ह्या भवसागरांतून पैलपार नेऊन जन्ममृत्यूच्या फे-यांतून मुक्त करतो. ह्मणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करून त्यांचिया गांवा । धांवत आलों ॥ नामाचेया सहस्त्रावरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥ आणि अर्जुना, अशा भक्तांकरितां मी सगुणरूप घेऊन त्यांच्या गांवाला धांवत आलो आहे; आणि माझ्या नामाच्या सहस्रावधि नावा करून त्यांना या संसारसागरांत तारू झालो आहे. म्हणून देव सांगतात, अर्जुना, माझी भक्ति कर आणि मद्याजी, माझे यजन कर; गंधपुष्पादिक द्रव्यांनी माझी पूजा कर. मां नमस्कुरु आणि माझ्याठायीं नम्रबुद्धि धरून सर्वत्र मीच आहे, अशा भावनेने मला नमस्कार कर. म्हणजे शेवटीं तू मला पावशील; आणि इतकें सांगितल्यावर देव अखेर सांगतात, अर्जुना, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुचः ॥ अर्जुना, स्वभावजनित जे धर्म आहेत ते यथाधिकार कर; पण कर्तृत्वादि भावना सोडून आणि या धमनींच मोक्षप्राप्ति होणार आहे, हे अज्ञान टाकून सर्वाराध्य, सर्वकर्ता, अत्यंत देदीप्यमान अशा ज्ञानरूप दीपानें सकल प्राणीमात्रांच्या अंतःकरणांत प्रकाशित झालेला जो मी, त्या मला ज्ञानाने ओळखून शरण ये. बा अर्जुना, पुण्यकारक धर्माचरणाने स्वर्गादिक सुखें मिळतील, परंतु जन्ममृत्यु टळणार नाही. मोक्षप्राप्तीनेच मात्र तो टळतो. आणि