पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/69

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ५९ अर्जुना,तें मोक्षपद मिळविण्याकरिता तुला अनन्यगति चित्तानें शरण आले पाहिजे. आणि अशा रितीने तू मला शरण आलास, म्हणजे मग ताकौनियां काढिलें । लोणी माधौतें ताकीं घातलें । परि न घेपेचि कांहीं केलें । तेणे जेविं ॥ मग ताक घुसळून काढलेले लोणी, फिरून ताकांत घातले, तर ते कांहीं केले तरी जसे घेत नाही, त्याप्रमाणे तू मला अद्वैयपणाने शरण आलास. म्हणजे तुला धर्माधर्माची कांहीं एक गरज राहणार नाही. अर्जुना, तू शोक करू नकोस. अनन्यभावाने मला शरण ये ह्मणजे तू मटूपच होऊन जाशील. महाराज, याप्रमाणे भाक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताला शरण गेल्यानेच मोक्षपद प्राप्त होणारे आहे, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. आणि बापहो, संजयांनी. राजा धृतराष्ट्राला आपल्या उत्तरांत पर्यायाने तेच सांगितले आहे. संजय म्हणतात, राजा धृतराष्ट्रा, या युद्धांत अखेर जय कोणाला होईल म्हणून तुम्ही मला पुन्हा विचारतो, तर - यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिधुवानीतिमतिर्मम ॥ राजा, मला दुस-या तिस-याचे कांहीं माहीत नाहीं, पारि आयुष्य तेथे जिणें । हे फुडें कीं गा ॥ पण आयुष्य असेल तेथे जीव असावयाचा ही गोष्ट उघड आहे. हे असो तेथ प्रकाश । सूर्य जेथे ॥ तैसे सकळ पुरुषार्थ । जेणे स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ महाराज, जेथे सूर्य आहे तेथे प्रकाश असावयाचाच; त्याप्रमाणे सकल पुरुपार्थाने शोभणारा प्रभु श्रीकृष्ण, जेथे स्वतः विद्यमान आहे, तेथे, म्हणजे अशा रितीने नरनारायणांनी अधिष्ठिलेल्या धर्मराजाचे पक्षाचे ठिकाण, शत्रुपराजयाने राजलक्ष्मी प्राप्त होणारी आहे. कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणे भागें ॥ हैं जय लागवेगें । तेथेंचि आहे ॥ राजा, स्वयमेव विजयस्वरूप श्रीकृष्ण ज्या युधिष्ठिर पक्षाकडे स्वतः उभा राहिलेला आहे, त्या पक्षाकडे उत्कर्षरूप विजय उत्तरोत्तर वृद्धिंगत पावणारा आहे, हे