पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. अहाहा ! पूर्ण परब्रह्म श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा केवढा अलाईक माहिमा कीं श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा अवतार होऊन आज सहाशे वर्षे होऊन गेली, तरी अद्यापि लक्षावधि वारकरी हातांत टाळ, विणा, मृदंग घेऊन मुखानें “ ज्ञानोबा माउली ' या अत्यंत पवित्र नामाचा गजर करीत, प्रतिमासी हरिदिनीं पुण्यक्षेत्र आळंदीस लोटत असून, श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या समाधिदर्शनाने संसारउपाधींतून आपली मुक्तता करून घेऊन सुखी होत आहेत ! कोट्यवधि भावीक श्रीज्ञानोबारायांनी केलेल्या रसाळ, दिव्य आणि भक्तिपर अभंगांचा पाट गाऊन परलोकचे थोर साधन नित्यशः जोडीत आहेत ! असंख्य मुमुक्षु श्रीज्ञानोबारायांनीं विश्वोद्धारार्थ निर्माण केलेल्या श्रीज्ञानेश्वरीमातेचे दुग्धपान करून आपला भवन्याधिरूपी रोग दिगंतरीं घालवून ज्ञानसंपन्न होत्साते देहत्यागानंतर चिन्मयपदाची जोड मिळवीत आहेत ! कित्येक श्रीज्ञानोबारायांच्या अमृतानुभवरूपी सुधेचे प्राशन करून अजरामरत्वाची जोड मिळवीत आहेत ! आणि प्रपंचाटवी हिंडतां हिंडतां थकून भागून गेलेले असंख्य जीव श्रीज्ञानोबारायांच्या पासष्टी, योगवासिष्ट ह्यांसारख्या ग्रंथरूपी मोक्षवृक्षांच्या घनदाट छायेंत घटकाभर बसुन आपला शीणभाग घालवीत आहेत ! | श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी आपल्या अवताराच्या बावीस वर्षांच्या अल्पकाळांत आपल्या गंभीर आणि रसाळ वाणीने आह्मां जड भारतयांचे अज्ञान घालवून व आमच्या अंतःकरणांतील भेदांकुर उपटून टाकून, आमच्या पाखंडबुद्धचे निरसन केलें ! आणि आम्हांस हा दुस्तर भवसागर तरून जाता यावा म्हणून परमेश्वरभक्तीची नाव आमच्या हाती दिली ! वैष्णवांना हरिभक्तीच्या नाना कल्पना सांगून वैष्णवमार्गाची स्थापना केली ! श्रीमद्भगवद्गीतेचा गूढार्थ आम्हां प्राकृत जनांकरितां मराठीभाषेत शोधून आणि श्रीमद्भगवद्गीतेत वणिलेल्या चरित्रासारखे चरित्र स्वतः करून दाखवून, गीतार्थबोधाचा ठसा आमच्या मनावर पूर्णपणे उठवून दिला ! आणि जात्यभिमान, वर्णाभिमान अथवा कुलाभिमान बाळगून अज्ञानाने आचरण केलेला कर्ममार्ग, हे मुक्तीचे खरे साधन नसून, ज्ञानाने भगवंताला ओळखून निस्सीम भक्तियुक्त अंतःकरणाने परमेश्वरास शरण जाणे, हाच मोक्षप्राप्तीचा खरा मार्ग आहे; परमेश्वराच्यापाशी जाति, वर्ण, कुल ह्यांचा अथवा श्रीमान्, गरीब, थोर, लहान, ज्ञानी, अज्ञानी, पुरुष, स्त्री ह्यांचा भेदाभेद नाहीं; देव सर्वांना भक्तीने सारखाच वश होणारा आहे; मग तो ब्राम्हण असो, वैश्य असो, शूद्र असो किंवा अंत्यज असो, शास्त्रज्ञ असो अथवा मूढ असो, परमेश्वराची त्याने एकनिष्ठ