पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० श्रीज्ञानेश्वरमहाराज. उघड आहे. भूतिः, संपदविस्तारही तेथेच होणारा आहे. राजा, अर्जुन हा विजय नांवाने प्रख्यात आहे, आणि श्रीकृष्णनाथ तर विजयस्वरूपच आहेत; तेव्हां लक्ष्मीसहवर्तमान विजय तेथेच असणार हे खचीत संजय म्हणतात श्रीव्यासांच्या खरेपणावर जर तुमचा विश्वास असेल तर महाराज, हे माझे भाषण अढळच आहे हे पक्के समजा. जेथ तो श्रीवल्लभ । तेथ' भक्तकदंब ।। तेथ सुख आणि लाभ । मंगळाचा ॥ महाराज, जेथे तो लक्ष्मीपति भगवान् आहे, तेथे भक्तांचा समुदाय आणि तेथेच सुखाचा आणि कल्याणाचा लाभ प्राप्त होणार आहे. संजयांनीं धतराष्ट्राला याप्रमाणे सांगितल्यावर ते शेवटी म्हणाले, या बोला आन होये । तरि व्यासाचा अंक न वाहे ॥ माझ्या या भाषणांत अंतर पडेल तर मी श्रीव्यासांचा शिष्यच होणार नाही, असे मोठ्याने बोलून संजयांनीं बापहो, अशा रितीने संजयांनी या एका उत्तराने राजा आवेशाने हात उचलला. धृतराष्ट्राच्या हातांत सकल भारतसार दिले. संजयांच्या या वचनाचा अर्थ असा की, राजा धृतराष्ट्रा, तुझे पुत्र दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, आणि ते जोपर्यंत भगवंताला शरण गेले नाहीत, तोपर्यंत त्यांना लक्ष्मी, जय, इत्यादि मिळणार नाहींत. यासाठी राजा, भगवंताला शरण जाऊनच आपले हित करून घेतले पाहिजे. परंतु संजयांनीं में पर्यायाने सांगितलेले धृतराष्ट्राला कसे कळणार ? असो. महाराज, गीता जाणा हे वाड्मयी । श्रीमूर्ति प्रभूची ॥ गीताशास्त्र हैं। सारें परब्रह्मस्वरूपच आहे. कलिकालरूपी ज्वराने पीडित झालेल्या जनांकरितां श्रीत्र्यंबकांनी जसा गंगेचा प्रवाह निर्माण केला, तैसे गीतेचे हे दुभते । वत्स करूनि पार्थातें । दुभीनली जगापुरते । श्रीकृष्णगाय ॥ श्रीकृष्ण भगवान हेच केणी एक गाय, ह्यांनी अर्जुनाला वासरू करुन सर्व जगाला पुरेल असे हे गीतारूपी दूधच दिले आहे. बापहो, जर हे पोटांत व्याल, तर तुम्ही ईश्वरस्वरूप व्हाल. गीतापाठाची वाटी जरी तोंडाला लावाल तरी तुमच्या अंगाला ब्रह्मतेची पुष्टि येईल.