पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ 1 अंक २ रा.. इतकंच नाही तर ही गीला नुसती कानांनी ऐकाल तरी सुद्धा मोक्षपदाप्रत जाल. महाज, आणि कृष्णार्जुनी मोकळी । गोठी चावलेली जे निराळीं । ते श्रीव्यासे केली करतळीं । घेवों ये ऐसी॥ भगवान् श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांनीं जें हैं भाषण अधांतरीं केले होते, ते श्रीव्यासांनीं करतळी घेता येईल असे करून ठेविलें, हा श्रीव्यासांचा जगतावर मोठाच उपकार झाला. श्रीव्यासांचा माग घेत घेत, भाष्यकारांना वाट विचारीत, मी हे महाठी भाषेत केलेलें गीतार्थ ओवीबद्ध काव्य, हे श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेचे वैभव आहे. श्रीशंकरापासून मत्स्येंद्रनाथांस, मत्स्येंद्रनाथांपासुन गोरक्षनाथांस, गोरक्षनाथांपासून गैनीनाथांस आणि गेनीनाथांपासून श्रीनिवृत्तिनाथांस गुरुपरंपरेनें प्राप्त झालेले हे समाधिरूप धन ग्रंथरूपाने बांधून श्रीनिवृत्तिनाथांनाच माझ्या हाती दिलेले आहे, आणि ग्रंथ पुढे करून या काव्याच्या निमित्ताने जगाचे संरक्षण केले आहे. तर महाराज, परस्वाधीनपणाने, आचार्य या नात्याने जें मी उणें घुरें बोललो असेन, त्याची मला आपण जननाच्या नात्याने क्षमा करावी. शब्द कसा योजावा, अर्थ कसा साधावा, अलंकार म्हणजे काय, हे मला माहीत नाही. माझ्या श्रीनिवृत्तिनाथगुरूंनी जसे मला दाखवून दिले तसतसे मी बोलत गेलों. माझ्या श्रीनिवत्तिनाथसद्रूंनी मला तुम्हांसारख्या संतांची जोड मिळवून दिली तिच्या योगाने माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. महाराज, तुझांसारखे मायबाप मला मिळाले म्हणून हा माझा ग्रंथाचा हट्ट तुमच्याच अनुकूलतेने शेवटास गेला. महाराज, हा ग्रंथसागर येव्हडा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिवजयाचा थेंडा । नाचे जें कां ॥ हा येवढा ग्रंथसागर उतरून पैलतीरावर कीर्तिविजयाचा झंडा मी फडकाविला हा, महाराज, तुमचाच प्रसाद होय. काय बहु बोल सकळां । मेळविलों जन्मफळा । ग्रंथसिद्वीचा सोहळा ॥ दाविला जो हा ॥ फार काय सांगू ? ग्रंथसमाप्तीचा जो हा सोहळा तुह्मीं मला आज दाखविला त्या योगाने माझ्या जन्माची सफलता झाली ! तुमचें जें हें मीं धर्मकीर्तन