पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. केले ते तुमचे तुह्मींच सिद्धीस नेले, यांत माझा सेवकपणा मात्र उरला. आता विश्वात्मके देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।।। तोषोनि मज द्यावें । पसायदान हैं ॥ जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती बाढी । भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचें ॥ दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात । वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूतळीं । भेटो तयां भूतां ॥ चलां कल्पतरूचे अरव । चेतना चिंतामणीचे मांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तड जे तापहीन । ते सर्वांहीं सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्वमुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजजो आदिपुरुषीं। अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये। विशेष छोकीं इये । दृष्टादृष्टविजये । होआवे जी ॥ तरी आतां मीं जो हा वाग्यज्ञ केला त्याच्या योगाने विश्वात्मक देवाने संतुष्ट होऊन मला एवढा प्रसाद याबा कीं, दुष्ट लोकांची वाईट बुद्धि जाऊन, त्यांची सत्कर्मी प्रवृत्ति वाढो. प्राणीमात्रांमध्ये सर्वत्र परस्परांचा स्नेह जमो. पापरूपी अंधकार नष्ट होऊन, स्वधर्मरूप सूर्याचा उदय होवो. आणि जो जो प्राणी जी जी वांच्छा धरील ती ती त्याची वांच्छा परिपूर्ण होवो. आणि सदासर्वकाळ जगाचे कल्याण इच्छिणा-या अशा भगवढुक्तांचे समुदाय प्राणिमात्रांस निरंतर भेटोत. आणि कोट्यवधि चालते बोलते कल्पतरुच सजीव, चिंतामणांचे गांवच, अमृताचे चालते बोलते समुद्रच, जे कलंकरहित चंद्र, जे तापराहत सूर्य, असे जे संतजन ते सदासर्वकाळ सर्वांचे सोयरे होवोत. किंबहुना तिन्ही लोक सर्वमुखी पूर्ण होऊन आदिपुरुष जो परमेश्वर त्याच्या भजनीं अखंड लागोत, आणखी महाराज, या लोकीं हा ग्रंथ जो कोणी विशेष आदराने बाळगील, तो इहपरलोकीं विजयी होवो ! निवृत्तिनाथः- (श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे मस्तकावर हात ठेवून) ज्ञानराजा, हा प्रसाद होईल !