पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. मुक्ता०- दादा ज्ञानदेवा, या सिद्धांच्या आसमंतात् हीं मृतजीवांची असंख्यात प्रेते कां बरें पडली आहेत ? ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, तो पलीकडे प्रेतरक्षक उभा आहे, त्यालाच हे आपण विचारूं, झणजे तोच आपल्याला याचे उत्तर देईल ! मुक्ता०- ( प्रेतरक्षकाजवळ जाऊन ) बाबा, हे सिद्ध कोण आहेत ? हीं एथे कोणाचीं प्रेते पडली आहेत ? या प्रेतांना दुर्गधी येऊ लागली आहे तरी तुह्मीं यांना अद्यापि अग्नि कां दिला नाहीं ? तुह्मी कोण ? आणि एथे कां उभे आहां ? हे कृपा करून आम्हांला सांगा बरें ? । प्रेतरक्षक- मुली, नानामंत्रांचे अधिष्ठान करून अनेक दैवते ज्यांनी प्रसन्न करून घेतली आहेत, असे हे अष्टांगयोगसंपन्न महासिद्ध चांगदेवमहाराज असून, त्यांच्या सभोंवतीं हा त्यांचा शिष्यवर्ग आहे ! या कलियुगांत आयुर्मर्यादा शतवर्षीचीच असल्यामुळे ज्या ज्या वेळी या सिद्धांचा मृत्युकाल समीप येतो, त्या त्या वेळी हे सिद्ध समाधि लावून बसून काळाची वंचना करितात! आणि अशा रितीने हे सिद्ध आज चौदाशे वर्षे वाचले आहेत! यांच्या योगसिद्धीचे असे अलौकिक सामर्थ्य आहे की, ज्यावेळेस है सिद्ध समाधीचे विसर्जन करितात, त्यावेळेस कोणी आहे काय ? ? असा प्रश्न हे विचारतात. तेव्हा त्यांच्याजवळ जितके मृतजीव पडले असतील तितके सर्व * आह्मी आहों ! ?? असे म्हणत जिवंत होतात ! सिद्धांच्या या अलौकिक सामर्थ्याची कीर्ति दिगंत पसरली असल्यामुळे, हे सिद्ध ज्या ठिकाणी समाधि लावून बसले असतील, त्या ठिकाणी दूरदूरच्या प्रांतांत राहणारे लोक, आपल्या मृत आप्तांचीं प्रेते आणून टाकतात ! हीं जी प्रेते तुला एथे दिसत आहेत ती सर्व दूरदूरच्या प्रांतांतील लोकांनीं येथे आणून टाकली असून, हे सिद्ध समाधींतून उठेपर्यंत या प्रेतांचे संरक्षण करण्याकरिता त्यांनी मला एथे बसावलें आहे ! मुक्ता- तर मग कायहो बाबा, हे सिद्ध समाधि विसर्जन करीपर्यंत हीं प्रेते अशीच पड़म राहणार आं ! आणि मग सिद्धां