पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/77

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ अंक ३ रा. च्या अनुग्रहाने हीं जीवंत होणार! दादा ज्ञानराया, या मृतजीवांची ही दशा पाहून माझे अंतःकरण कळवळत आहे ! पण अंगीं सामर्थ्य असल्यावांचून नुसते कळवळणे काय उपयोगाचें ? ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, या सिद्धांनीं नानाविध मंत्रांचे अध्ययन करून आणि देहास अनंत कष्ट देऊन हे अलौकिक सामर्थ्य संपादन करून घेतले आहे ! आणि मजसारखा सिद्धश्रेष्ठ या त्रिभुवनांतही कोणी नाही, असा अहंकार हे सिद्ध चित्तांत सदैव बाळगीत आहेत ! परंतु माझ्या पांडुरंगाच्या नामाचा असा अद्भुत माहमा आहे कीं, जीवांनीं श्रीपांडुरंगाचें नांव सप्रेम भक्तीने उच्चारिले असता, सायासावांचून विश्वांतील सकल सिद्धींचे सामर्थ्य त्यांच्या आंगीं येते ! यासाठी हे जीव आतांच जिवंत व्हावे अशी तुझी इच्छा असेल तर श्रीपांडुरंगाचे ध्यान हृदयीं आणून मुखाने श्रीविठ्ठलनामाचा गजर कर; म्हणजे श्रीरुक्मिणीवराच्या कृपेने तुझे हेतु पूर्ण होतील! आणि त्याबरोबरच सर्व साधनांपेक्षां हरिनाम हे दिव्य साधन संतांच्या हातीं श्रीपांडुरंगाने दिले आहे ! या गो चा साक्षात्कार ह्या सिद्धांस पटून यांचे चित्त श्रीपांडुरंगचरणीं जडेल ! ( मुक्ताबाई विठ्ठलनामाचा गजर करू लागते. अमळशाने सर्व प्रेतांत जीव उत्पन्न होऊन त्वांची हालचाल सुरु होते. इतक्यांत श्रीज्ञानेश्वरमहाराज व मुक्ताबाई तेथून निघून जाऊन अदृश्य होतात. पुनर्जीवन झालेली माणसे झोपेतून जागी झाल्याप्रमाणे उठून बसतात; व कांहीं वेळ इकडे तिकडे सायर्य मुद्रेनें अवलोकन करून प्रेतरक्षकाजवळ येतात. ) | एक गृहस्थ- अहो बाबा, ज्या सद्गुरूंनीं आह्मांला या काळझोपेतून उठवून जिवंत केले ते सद्गुरु कोठे आहेत ? प्रेतरक्षक-- बाबा, ते इतक्यांत मी पाहता पाहतां अदृश्य झाले ! एक बाई- तर मग ज्या सद्गुरूंनी आम्हांला पुनर्जीवन दिलें या प्रभूचे दर्शन आम्हांला या वेळीही होत नाहीं आं ! तेव्हा किती हो आम्ही घोर पातकी आहों ! अहो बाबा, ते कोणीकडच्या