पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/78

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. दिशेने गेले ते तरी सांगा, झणजे त्या दिशेने जाऊन आम्ही त्यांचा शोध करू ! प्रेतरक्षक- जेथपर्यंत ते मला दिसत होते तेथपर्यंत मी तुह्मांला घेऊन जात ! चला माझ्याबरोबर. सद्गुरुचरणांचे दर्शन घडण्याइतके थोर पुण्य जर तुमच्या गांठीं असेल तर ते तुह्मांला अजूनही घडेल ! चला, या माझ्यामागें. ( सर्व निघून जातात. अमळशानें ध्यानस्थ चांगदेव समाधि विसर्जन करतात.) चांगदेव-( झांकलेल्या नेत्रांनीच ) कोणी आहे काय ? (या प्रश्नास उत्तर न मिळाल्यामुळे ) काय ? कोणीच उत्तर देत नाही ? तर यावरून या वेळी यमराजाला गाढ निद्रा लागल्यामुळे विश्वसंहाराचे काम तूर्त बंद पडले आहे असे दिसते ! ( इतक्यांत सर्व शिष्य समाधीचा त्याग करून चांगदेवसिद्धांपुढे हात जोडून उभे राहतात. चांगदेवसिद्ध नेत्र उघडून त्यांपैकी एकाकडे पाहून ) बेटा, यमलोकींच दरवाजे बंद करून घमराजाने या वेळीं गाढ निद्रेचा अंगीकार केला, हे एक वरेंच झाले ह्मणावयाचें ! पहिला शिष्य-स्वामीमहाराज, यमराजाला विश्रांति हा शब्द कोठून माहीत असणार ? चांगदेव- बेटा, समाधि विसर्जन करतांच, मी नेहमीच्या परिपाठाप्रमाणे ' कोणी आहे काय ? ? असा प्रश्न विचारिला असतां, ओ देणारा एकही प्राणी आज मला येथे आढळला नाहीं ! म्हणून माझ्या मनांत अशी शंका उत्पन्न झाली. | पहिला शिष्य- स्वामीमहाराज, स्वामींनीं अनुज्ञा केल्याप्रमाणे स्वामींच्या समाधिकाळी मी मौनव्रत धारण करून, नेत्र आणि कान उघडे ठेवून, स्वामीदेहाचे संरक्षण करीत होते. तेव्हा या माझ्या नेत्रांनी मी आज एक अलौकिक चमत्कार अवलोकन केला ! तो साद्यंत वृत्तांत स्वामींची आज्ञा होईल तर स्वामींच्या चरणीं निबेदन करतों ! चांगदेव-बेटा, असा आश्चर्य वाटण्यासारखा कोणता चमत्कार तूं पाहिलास तो सांग पाहूं ?