पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, अंक ३ रा. पहिला शिष्य- गुरुजी, आपण समाधिस्थ झाल्यावर, आपल्या समाधीची वार्ता चोदेशीं अबालवृद्धांच्या कानीं गेली. तेव्हां नेहमीच्या परिपाठाप्रमाणे लांबलांबच्या देशांत राहणारे हजारों लोक आपले मृतसंबंधी खांद्यावर टाकून येथे आले आणि मृतांस प्रेतरक्षकाच्या स्वाधीन करून आपापले देशी निघून गेले! कांहीं काळ लोटल्यावर एक पंधरा वर्षांचा लहान बालक आणि दहा वर्षांची एक लहान मुलगी मुखानें हरिनाम गात या वाटेने जाऊ लागली. गुरुजी, त्या उभयतांची अंगकांति अत्यंत तेजःपुंज असून त्यांच्या मुखांवर विलक्षण तेज झळकत होते! मला तर त्यांना पाहून ते साक्षात् देवच या भूलोकी मानवदेह धारण करून उतरले आहेत असे वाटलें ! वाटेने जातां जातां त्यांची दृष्टि स्वामींच्याकडे गेली. तेव्हां त्या उभयतांनी स्वामींच्यापुढे येऊन सप्रेम चित्ताने स्वामींस नमस्कार घातला ! आणि मग प्रेतरक्षकास स्वामींबद्दल आणि येथे पडलेल्या मूतजीवांबद्दल सर्व हकिकत विचारली. तेव्हा प्रेतरक्षकानें स्वामीमहाराजांबद्दल आणि त्या प्रेतांबद्दल सर्व वर्तमान त्यांस श्रुत केले. तो वृत्तांत ऐकून त्या कुमारचे हृदय करुणेने आई झालें, आणि तिने सजल नेत्रांनी तिच्याबरोबर असलेल्या त्या बालतपोनिधीस त्या मतजीवांस तत्काळ सजीव करण्याबद्दलची आपली इच्छा प्रकट केली. त्या वेळी त्या बालप्रभूनें विट्ठलनामाचा गजर तीस करावयास सांगितला. तेव्हा काय चमत्कार सांगावा ? विट्ठलाचें नाम ती कुमारिका सप्रेमभक्तीने घेत असतां, इकडे सर्व प्रेतांत चलनवलनादि व्यापार सुरू झाले ! आणि काही वेळाने ते सर्व जीव झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून, आपलें पुनर्जीवन करणाच्या प्रभंच्या दर्शनासाठी आतुर होऊन इकडे तिकडे अवलोकन करू लागले! इतक्यांत इकडे या ईशमूर्ति अदृश्य होऊन दिसेनाशा झाल्या ! तेव्हां ज्या दिशेने त्या ईशमूर्ति अदृश्य झाल्याचा भास झाला त्या दिशेकडे ते सर्व जीव प्रेतरक्षकासह निघून गेले ! गुरुमहाराज, मी आजपर्यंत पुष्कळ योगी पाहिले; अनेक तपस्वी पाहिले; आणि अनेक संतही पाहिले; परंतु विठ्ठल