पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताना. भक्ति केली म्हणजे तो पवशी एकरूप होलो; ह्या ज्ञानाची ओळख श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी आम्हांस करून दिली ! स्वोन्नति व स्वोन्नतीमागून बोलतीकरितां ज्या अनेक अंगांनी आमचे प्रयत्न सांप्रत चालू आहेत, ते सुफल होण्यास आन्ही आपले अंग प्रथम धर्मश्रद्वेचे व ईश्वरिनष्ठेचे बळ प्राप्त करून घेतले पाहिजे. हैं बळ आम्हांस कसे प्राप्त करून घेता येईल याचा यथार्थ बोध सकल विश्वास करून देण्याकरितांच श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अवतार धारण केला असल्यामुळेच, श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे जीवनचरित्र नाट्वःरूपांत गोदून तद्वारे त्यांनी बोधिलेल्या भगवद्भक्तिसाधनोपायांची जागृति माझ्या देशबंधुभगिनांच्या अंतःकरणांत उत्पन्न केली असतां, राष्ट्रोन्नतीच्या भत्कायों मान अपस्वल्प तरी सेवा घडेल, अशा बुद्धीने मी हा प्रस्तुत। अन्न केला आहे. आता ही गोष्ट खरी की, ज्या श्रीज्ञानेश्वर महाराज जगद्गनी आम्हांस संसारबधापासून मुक्त करण्याकरितां आपल्या संसाराला जन्मतःच तिलांजलि दिली ! आम्हांस पन्नाथची ओळख करून देण्याकरिता आपल्या स्वार्थीचा होम केला ! अंगला चालवयांतच असंगाची राख । फासून तीव्र वैराग्य धारण केले आणि आमचे वैभव वृद्धिंगत करण्याकरितां आपल्या तृष्णेचा उच्छेद केला ! आमचे मनोरथ पूर्ण करण्याकरितां आपल्या वासना जाळून दग्ध केल्या ! आह्मांस लौकिकास चढविण्याकरितां आपला स्वतःचा लौकिक पायांखाली तुडविला ! आणि दुर्जनांनी कशब्दांचे व निदेचे शस्त्र उचलिलें असतां आपल्या शांत सद्बोधाने त्यांना मलितशस्त्र केले ! अशा पूर्ण पर्वझ ज्ञानश्रेष्ठांच्या व योग।श्रेष्ठांच्या चरित्रांत नाटक विषयास परिपोषक असे सामान्यजनांच्या चरित्रांतील मनोरंजक व हास्यरसोत्पादक प्रकार, किंवा चित्तास रमविणारे गादि ग्राम्य विषय, किंवा शरिरांतील रक्त चळवळविणार वीरौद्रादि नानाविध रस, यांचा पूर्ण अभाव असल्यामुळे मनरंजनाच्या मुळ्य हेनस विघातक असा हा अस्तुत नाटक विषय आहे. तरी पण भक्ति, ज्ञान, वैराग्य, नष्कन्य, विनय, शांति व क्षमा यांची साक्षात मूर्तीच जे श्रीज्ञानेश्वरमहाराज, त्यांचे चरित्र नेत्रांनी पाहून, त्यांची भक्तियुक्त व बोधपर वचने कानांनी ऐकून, परमेश्वराच्या अगाध प्रभुत्वाची आम्हां सर्वांस साक्ष पटन देण्याकरितां आपल्या अंगच्या ईश्वरी अंशाचे जे चमत्कार त्यांनी करून दाखविले त्यांचे साक्षात्कार आमच्या मनास पटून, आह्मी जात्याच भावीक व श्रद्धालु असे जे आर्यांचे वंशज त्या आमची मने शांत, गंभीर व भक्तिपर होतील; आह्मांपैकी ने