पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/81

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा.

  • ७१

• आहां, आपल्या आज्ञेनें पर्जन्यधारा वर्षांनी वसुंधरा सुखी होते, आपल्या संकटास्तव श्रीविष्णूंनी वामनरूप धारण करून बळीला पाताळी नेऊन पोहोंचविला, आणि आपलें पद राखिले, तरी आतां मज दीनावर कृपा करून मला उश्शाप द्यावा ह्मणजे त्याने माझा उद्धार होईल ! अशी मी स्वामींची स्तुति केली; आणि अनन्यभावाने स्वामींस शरण गेलो ! तेव्हां अमरपतीने संतुष्ट होऊन, मला असा उश्शाप दिला की, जगदुद्धार करण्यासाठी शिव, विष्णु, ब्रम्हा, निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, या नांवांनी मानवरूपानें कलियुगीं अवतार घेतील, आणि त्यांच्याबरोबर आदिमाया, मुक्ताबाई या नांवाने अवतरेल, तेव्हां त्यांना तं शरण जा. त्यांच्या उपदेशाने तू अध्यात्मविद्येत प्रवीण होशील! तेव्हा सद्गुरुकृपेने तुझ्या अंतःकरणांतील द्वैताचे निरसन होऊन, तुला सर्व जग विश्वरूप दिसू लागेल ! आणि मग भीमातीरीं श्रीपांडुरंग साक्षात् परब्रह्म विटेवर उभे राहिले आहेत ! त्यांची उपासना करण्याची सद्बुद्धि तुझ्या अंतःकरणांत उत्पन्न होईल ! तेव्हां श्रीहरीची तुजवर कृपा होऊन, तुला पूर्ववत् स्वर्गप्राप्ति होईल ! स्वामींमुखांतून निघालेला हा उश्शाप ऐकून मी संतुष्ट अंतःकरणाने स्वामींच्या पायांवर मस्तक ठेवून स्वामींचा धन्यवाद गाईला; आणि स्वामीआज्ञेप्रमाणे स्वर्गातून या भूलोकीं मानवदेहानें उतरलों ! परंतु बळी वामनाला शरण रिवाला असतां, ज्याप्रमाणे शुक्राने त्याला अडथळा केला, तसे माझ्या प्रतिकूल भाग्याने आज मध्ये आडवे येऊन, ज्या श्रीज्ञानेश्वर सद्गुरुंची पायधूळ मस्तकीं घेऊन शापमुक्त होण्याकरितां मी योगासद्धीने चौदाशें वर्षे जिवंत राहिलो, त्या परात्पर सद्गुरूंच्या दर्शनाचा आज सुयोग आला असतां, तो मला घडू दिला नाहीं ! म्हणून शिष्यहो, मला यावेळी अत्यंत खेद वाटत आहे ! ( इतक्यांत प्रतिष्ठानक्षेत्री पाठविलेला शिष्य येतो व चांगदेवांस नमस्कार घालून हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहतो. ) दुसरा शिष्य- गुरुमहाराज, आज्ञेप्रमाणे या सेवकानें गुरुंनी दिलेली आशीर्वादपत्रिका प्रतिष्ठानक्षेत्रस्थ ब्रह्मश्रेष्ठांस नेऊन दिली.