पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/82

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*७२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. तेव्हा त्या श्रेष्ठांनीं पत्रिकेच्या मुखावर स्वामींची मुद्रा पाहून, पूज्यभावाने त्या पत्रिकेस आलिंगन दिले आणि त्यांनी ती आपल्या मस्तकीं धारण केली. मग ती पात्रका खाली ठेवून त्यांनी तीस । साष्टांग नमस्कार घातला ! स्वामी कुशल आहेतना ? असा प्रश्न विचारून, मी स्वामी कुशल आहेत असे सांगतांच, परम आल्हाद. युक्त अंतःकरणाने त्यांनी ती पात्रका उलगडून वाचण्यास सुरबात केली. पात्रका वाचतांच त्या श्रेष्ठांस श्रीज्ञानेश्वरादि बालवेषधारी सद्गुरूंचे स्मरण होऊन ते सद्गदित झाले आणि त्यांच्या नेत्रांवाटे एकसारख्या प्रेमाश्रुधारा वाहू लागल्या ! अमचे पूर्वार्जित फार थोर, म्हणूनच आह्मांला अशा प्रभूचे दर्शन झालें ! धन्य ! धन्य ते सद्गुरु ! साक्षात् परमेश्वरच ते ! काय त्यांचे अगाध ज्ञान ! काय त्यांचे वैराग्य ! काय त्यांची ईश्वरभाक्त ! त्यांचे यश आम्ही कोठवर वर्णन करावें ? अशा प्रभूच्या विमलकीर्तिरूप चंद्राचा प्रकाश सिद्धांच्या आश्रमावर गेला काय ? पण यांत आश्चर्य ते कोणते ! प्रातःकाळ होतांच, संपूर्ण अंधकारास दशदिशा उडविणा-या सूर्यनारायणाचा उदय झाला आहे, असे सांगण्याकरितां दूत थोडेच पाठवावे लागतात ! श्रीसूर्यनारायणाची किरणेच दूतत्व पतकरून सूर्योदयाची बातमी सर्व जगभर पसरीत असतात ! असे म्हणून सर्वांनी एकत्र बसून स्वामींस देण्याकरिता एक पत्र लिहून मजजवळ दिले. आणि तोंडीं मला असे सांगि तलें कीं, हे देवत्रयप्रभु प्रतिष्ठानक्षेत्रांतून निघाल्यावर निवास क्षेत्री गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं श्रीमद्भगवद्गीतेवर भावार्थदीपिका नांवाची महाठी भाषेत टीका लिहिली! आणि निवासक्षेत्रांतील अबालवृद्ध स्त्रीपुरुषांस श्रीमद्भगवद्गीतेचा गूढार्थ पूर्णपणे समजून देऊन त्यांस ज्ञानाची ओळख करुन दिली! आणि तेथून ते नुकतेच त्यांची जन्मभूमि जें अलंकापुरक्षेत्र तिकडे निघून गेले. हे साद्यंत वर्तमान स्वामींस निवेदन करून, प्रतिष्ठान क्षेत्रस्थ श्रेष्ठांनी दिलेले हे पत्र मी स्वामीचरणी अर्पण करीत आहे. ( चांगदेवांच्या पुढे पत्र ठेवितो. ) । चांगदेव- (पत्र वाचून झाल्यावर ) शिष्यहो, त्या बाल प्रभं