पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/83

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|अंक ३ रा. ७३ बद्दल प्रतिष्ठान क्षेत्रांतील ब्राह्मणाने आपणास सांगितलेला वृत्तांत अक्षरशः खरा आहे, असे या पत्रांत लिहिले आहे ! कायहो परमेश्वराची ही एकाहून एक अघटित करणी ! माझे गायन अत्यंत रसाळ असा अभिमान नारदाला चढलेला पाहून, श्रीकृष्णप्रभुंनीं अस्वलाच्या मुखांतून संपूर्ण राग गाववून नारदाचा गर्व खंडन केला ! महासागराला आपल्या विशाल उदरांत सांठविलेल्या उदकाचा गर्व झालेला पाहून, अगस्ति मुनीने एका आचमनानेच रत्नाकराचा अभिमान नष्ट केला ! ब्रह्मदेवाला सृष्टिकर्ता काय तो मी एकच, असा अभिमान झाला, तेव्हा विश्वामित्र ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने प्रातिसृष्टि निर्माण केली ! स्वरूपामध्ये सर्व सुंदर काय ती मीच, अशा गर्वाने फुगलेल्या सत्यभामेला रुक्मिणीने जगन्माता जानकीचे रूप धारण करून लज्जित केलें ! त्याप्रमाणे मी चौदा विद्या आणि चौसष्ट कला शिकलो आणि सर्व सिद्धि प्राप्त करून घेऊन टा वर्षे वांचलों ! परंतु माक्षात् परब्रह्ममूर्ति श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी आजची ही अद्भुत करणी करून दाखवून माझे चित्त जागच्या जागी मुरवून टाकिलें ! तरी सर्व शिष्यवर्गाला माझे असे सांगणे आहे की, तुह्मी यापुढे माझे पूजन कधीही करू नये ! तिसरा शिष्य- गुरुमहाराज, आपणांस आमचा इतका कोप येण्यासारखे आम्हां दीन दासांकडून स्वामिसेवेत कांहीं यन पडले असल्यास, स्वामींनीं सदय होऊन आम्हांला त्याबद्दल क्षमा करावी ! चांगदेव-शिष्यहो, तुमच्या हातून आमच्या सेवेत कांहीं उणे पडलें म्हणून मी क्रोधाने अशी आज्ञा करीत आहे असे नाहीं. तर या भूतलावर जे पूजार्ह आहेत, त्यांचीच पूजा करणे उचित आहे ! श्रीज्ञानेश्वरमहाराज आम्हांपेक्षां ज्ञानी असून पजेचे खरे अधिकारी तेच आहेत ! राजाधिराज रामचंद्रमहाराज कुशलवांच्या धनुर्विद्येपुढे जसे निस्तेज झाले, त्याप्रमाणे श्रीज्ञानेश्वर सङ्गुरूंच्या पूर्णब्रह्मस्वरूपापुढे आमच्या सकल विद्या आणि