पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. सकल कला निस्तेज झाल्या आहेत ! म्हणून त्या परात्पर जगदुरूंचीच पूजा करणे उक्त आहे ! शिष्यहो, अशा सद्रूंचे पादरज माझ्या मस्तकास लागून त्यांच्या गुरूपदेशाने मी कधी कृतार्थ होईन, या चिंतेने मला यावेळी कांहींच सुचेनासे झाले आहे ! || चौथा शिष्य- सिद्धराज गुरुमहाराज, आपण श्रुतींचा अभ्यास केला, चारी वेद मुखोद्गत केले, न्याय-व्याकरण इत्यादि पढून हा प्रचंड भूगोल खाली उतरविण्याची विद्याही संपादन केली, आपण वर्तमान-भूत-भविष्य जाणत, महारोगांचा परिहार करणारे आपण धन्वंतरी आहां, धनुर्विद्येतही आपण निष्णात आहां, कामशास्त्र, संगीतशास्त्र आणि नृत्यकला यांचाही आपण अभ्यास केला आहे,परकायाप्रवेश करण्याची विद्या आपण संपादिली आहे, सकल प्राणिमात्रांच्या मनात काय आहे हे आपण जाणतां, ब्रम्हांडभुवनांत काय चालले आहे ते योगसामथ्र्याने आपण निमिषार्धात पाहून येतां, पृथ्वीवरील सर्व राजे आपले शिष्यत्व पतकरून आपले आज्ञांकित दास बनले आहेत, सर्व जगांतील वड, तरुण, ज्ञानी, अज्ञानी, श्रीमंत, गरीब, आपली सद्भावाने पूजा करतात; असा आपला अधिकार असून यःकश्चित् अजाण पोरांची कीर्ति ऐकून आपण अशा रितार्ने निरुत्साह होणे, हें स्वामीमहाराज माझ्या अल्पबुद्धीने बरे नाहीं ! चांगदेव- बेटा, आकाशालाही आधार देववेल ! अस्ताला जाणारा सूर्यही एक वेळ हातांत धरवेल ! पृथ्वीचे वजनही करतां येईल ! परंतु भगवद्भक्तांची अगाध करणी ओळखतां येणे फार कठीण आहे ! याकरितां श्रीसद्रू ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनास जाण्याचे आह्मी मनांत आणिलें आहे ! तरी सर्व शिष्यांनी उदयीक आह्मांबरोबर अलंकापुरीस जाण्याची तयारी करावी. दुसरा शिष्य- गुरुमहाराज, स्वामिचरणीं या दासाची एक विनंती आहे. ती स्वामींनी श्रवण करून मग जी उक्त ती आज्ञा करावी. अघटित कृत्ये केल्याने सिद्ध पुरुषांची सिद्धि फार दिवस टिकत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यासाठी ज्ञानेश्वराची सिद्धि अद्यापि स्थिर आहे किंवा नाही, याची आह्मी