पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. कोणी तरी अलंकापुरी जाऊन प्रतीति घेऊन येतों; आणि त्याची सिद्धि स्थिर आहे असे अनुभवास आल्यास मग स्वामींनी स्वतः जाऊन त्याचे दर्शन घेऊन यावें ! असे केल्याने ज्ञानेश्वराची अगोदर योग्य परीक्षा होईल!आणि स्वामींसही निरर्थक शीण होणार नाहीं। चांगदेव- बेटा, हा तुझा विचार आह्मांला मान्य आहे ! ( तिस-या शिष्याकडे पाहून ) बेटा, या सर्व शिष्यांत ते वयोवृद्ध व तपोवृद्ध आहेस. यासाठी तूच अलंकापुरीस जाऊन श्रीज्ञानेश्वर सदुरुंच्या संतपणाची परीक्षा पाहून त्वरित परत ये ! तिसरा शिष्य- गुरुजी, मी अत्यंत मूढ आहे. संतांना कसे ओळखावे, त्यांची रवूण काय, त्यांचे लक्षण काय, हे स्वामीं- • नीं कृपा करून या दासाला सांगावे. कारण, कित्येक संत गृहस्थाश्रमी असतात, कित्येक संसाराविषयी उदास असतात, कित्येक मालतकुष्ट आणि वेडे असतात, कित्येक सदा हसत राहतात, कित्येक शिव्या देऊन धोंडे मारतात, कित्येक मलिनस्थानीं बसतात, कित्येक कंठांत पुष्पमाळा घालून नाना भोगांचे सेवन करीत असतात, कित्येक अहोरात्र निद्रिस्त असतात, कित्येक सदा जागृत राहतात, कित्येक अन्नपाणी वर्ज करून वायु भक्षण करून राहतात आणि कित्येक नग्न असतात; तरी यांपैकी खरा संत कोण आणि त्याला कसे ओळखावे, हे स्वामींनी कृपा करून या दासाला सांगावे. जे स्वतः संत असतात तेच संतांना ओळखतात ! तेव्हा माझ्यासारख्या अज्ञानी दासाला त्यांचे स्वरूप कसे कळणार ? चांगदेव- बेटा, तुझे झणणे खरे आहे ! मलाही संतांचे वर्म कळत नाहीं ! तेव्हा त्यांना कसे ओळखावें हें मी तुला कसे सांगणार ? शिष्यहो, अशा वेळी काय करावे हेच मला सुचेनासे झाले आहे ! पहिला शिष्य-गुरुमहाराज, आह्मांला तेथे पाठविण्यापेक्षा स्वामींनी त्यांना येथूनच एक पत्र लिहावे; ह्मणजे स्वामींच्या पत्रास त्यांचेकडून जें उत्तर येईल, त्यावरून त्यांचे संतपण स्वामींस तेव्हाच ओळखता येईल !