पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7 अंक ३ रा.. ७७ दुसरा शिष्य- अशी शंका गुरुजींच्या मनांत उत्पन्न झाली असल्यास, गुरुजींनी कोरेंच पत्र पाठवून उत्तर मागवावें ! ह्मणजे अनायासेच ज्ञानेश्वराचे ज्ञान आणि संतपण ही दोन्हीही गुरुजींना कळून येतील ! माझ्या अल्पबुद्धीने हाच मार्ग यावेळी बरा दिसतो ! चांगदेव- ( कागद व लेखणी शिष्यास परत देऊन) शाबास ! बेटा, शाबास ! ही तोड तूं फारच चांगली सुचविलीस ! तर मग हे कोरेंच पत्र घेऊन, तूंच अलंकापुरीस जा आणि श्रीज्ञानेश्वरमहाराजांस भेटून, हे त्यांच्या हाती देऊन, त्यांना माझे नमन सांगून, माझे कुशल कळीव ! आणि चौकस मनाने त्यांची सिद्धि कशी काय आहे, त्यांनी कोणते शास्त्र पठण केले आहे, ते कोणतें अध्ययन करितात, कोणतें पुराण वाचतात, त्यांची भूतदया कशी आहे, ते वैष्णवी माया कशी पाहतात, कोणत्या योगाने ते इंद्रियांचे दमन करितात, स्नानसंध्या कशी करितात, त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार कसा काय आहे, ते कोणती तपश्चर्या करितात, लौकिकांत ते कसे वागतात, त्यांचे आचरण कसे आहे, त्यांचा योगक्षेम कोणत्या रितीने चालला आहे, त्यांनी कोणत्या विद्या साध्य केल्या आहेत, कोणत्या सिद्धीचा सोहळा ते लोकांच्या दृष्टीस पाडतात, त्यांचे उपास्य दैवत को|णते, इत्यादि सर्व गोष्टींचा गुप्तपणे शोध करून अलंकापुरीहून तूं। त्वरित परत ये. ह्मणजे तुझ्या परीक्षेस ते कसे काय उतरतात ते पाहून आह्मी पुढचा विचार करूं ! दुसरा शिष्य- ( चांगदेवास नमस्कार घालून ) स्वामींचा वरदहस्त माझ्या मस्तकीं असावा, ह्मणजे स्वामिकार्य माझ्या हातून निर्विन्न आणि त्वरित सिद्धीस जाईल ! ( चांगदेव शिष्याचे मस्तकावर हात ठेवून ' विजयी भव' असा आशीर्वाद देत असतां पडदा पडतो.)