पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/88

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. प्रवेश दुसरा. स्थळ अलंकापुर. ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे मठाकडे जाण्याचा रस्ता.) बहिरंभट- ( प्रवेश करून, त्याचा मुलगा धोंड्या मागून येत आहे, त्यास उद्देशून ) धोंड्या, अरे धोंड्या, ए गाढवा धोंड्या ! चल की रे लौकर ! सोन्या, पाय जरा लवकर उचल ! धोंड्या- ( प्रवेश करून ) बाबा, अजून किती हो लांब जायचे आहे ? माझे पाय आतां दुखायला लागले ! मी नाहीं आता पुढे यायचा जा ! ( पाय पसरून खाली बसतो. ) | बहिरंभट- अरे बाबा, आता थोडक्यासाठी नको रे मला असा छळू ! तुझ्याच बयाकरितां बरें बाबा, मी इतका ह्मातारा झालों, माझ्याने धड चालवत देखील नाहीं, तरी काठी टेकीत टेकीत इतका दूर आलों ! आणि गाढवा, तू आपला जागोजागी असा हातपाय पसरून बसतोस, तेव्हां कारट्या तुझे दैव मला धड दिसत नाहीं ! उठ ! बाबा, उठ ! माझ्या सोन्या, नको माझी अशी हाडें घुसळू! उठ ! ( धोंड्या उठत नाहीं; इतक्यांत हातांत पळीपंचपात्री घेतलेला एक गृहस्थ प्रवेश करतो.) बाहिरंभट- (गृहस्थास उद्देशून) नमोनमः ! महाराज, महानुभाव श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांचा मठ कोठे आहे, तो कृपा करून मला दाखवाल, तर तुमचे माझ्यावर थोर उपकार होतील ! गृहस्थ- आजोबा, आपण जगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा मठ विचारतां, यावरून आपण या अलंकापुरीतले राहणारे नसून कोठल्या तरी दूरच्या गांवाहून आलेले दिसतां ! कारण जगद् रूंचा मठ माहीत नाही, असा एकही मनुष्य या अलंकापुरीत सांपडावयाचा नाहीं ! | बहिरंभट- होय, महाराज, मी आळ्याचा राहणारा. माझे नांव बहिरंभट आणि हा माझा मुलगा; याचे नांव धोंड्या. आम्हीं सद्गुरूंच्या दर्शनाला आलो आहों !