पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• अंक ३ रा. : ७९ | गृहस्थ- आजोबा, जगद्गुरुंनी आपल्या पवित्र चरणांनी आळ्याचे उपवन नुकतेच पुनीत केले, तेव्हां जगद्गुरूंचे दर्शन तुह्मांला घडलें असतां, तुम्ही पुन्हा जगदुरूंच्या दर्शनाकरिता अशा वृद्धपणी काठी टेकीत इतक्या दूर कां आला ? कारण सद्रुस्मरणाचें महात्म्यही सद्गुरूंच्या साक्षात् दर्शना इतकेच आहे ! बहिरंभट- महाराज, हे खरे; पण हा माझा कारटा पडला दिवटा ! पोराची जात- त्याला काय कळणार ? सङ्गुरूंचे बालवय, तेव्हां त्यांना पाहून ते आपल्या बरोबरीचेच आहेत असे समजून, या कारट्याने सद्रूंची टवाळी केली ! आमच्या आळ्याच्या रानांत सद्गुरु राहिले असता, त्यांच्याबरोबर असलेला हलेश्वर जेव्हा मुखाने वेदघोष करूं लागला, तेव्हा हा पोरटा आमच्या आळ्याच्या कुटिलबुद्ध आणि मूर्ख ब्राह्मणांच्या आणि बरोबरीच्या कुटाळ पोरांच्या नादी लागून गुरुजी तर आह्मांला ब्राह्मणांशिवाय इतरांच्या कानीं वेद पाडू नयेत असे सांगतात, आणि असे असून हा रेडा ज्यापेक्षां ते वेद चांडाळादिकांच्याही कानीं पाडीत आहे, त्यापेक्षा असे भ्रष्ट झालेले वेद आह्मांला मुळीच नकोत ! असे ह्मणून लागला सद्गुरूंच्या पुढे वेडीवाकडी तोंडे करून त्यांची कुचेष्टा करायला ! महाराज, तुह्माला काय सांगावे ? हे भाषण. ऐकून सद्गुरुंनीं शांत चित्तानें “तथास्तु ?? ह्मणून झटलें ! पुढे दुसरे दिवशीच त्या रेड्याचा मृत्युकाल समाप आला. तेव्हा श्रीज्ञानेश्वरमहाराज त्या रेड्याला ह्मणाले, “महिषा, तुला जें वरदान मागणे असेल ते माग. ' तेव्हा तो महिष म्हणाला, “या पशुदेहाने सद्गुरूंनी मला अलं ह्मणजे पूर्ण केले आहे, तरी सद्गुरूंनी मला आतां जन्ममरणापासून सोडवावे. यावर, तू योगपंथाचा आश्रय कर, ऋणजे तुझे सकल वांच्छित तुला प्राप्त होईल, असे सद्रूंनीं त्या महिषाला सांगितले. हे सद्रूंचे वचन ऐकून त्या रेड्याने प्राणरोधन केले आणि ब्रह्मरंध्र विदारून त्याने देहत्याग केला! त्या वेळी त्या हलेश्वराच्या देहांतून एक दिव्य पुरुष बाहेर निघाला आणि जगद्गुरुंच्या चरणांवर लोटांगण घेऊन म्हणाला, “मी पसेंद्र ऋषिशापाने यासकट मी दोन जन्मीं