पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/9

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. नास्तिक आहेत, ज्यांच्या आंगावरून भगवद्भकीचे कधी वारेही गेले नाहीं अशांच्याही अंतःकरणांत श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या चरित्रांतील या नाटकांत गोवलेल्या प्रेमळ व हृदयंगम कथा प्रहरभर पाहिल्याने आस्तिक बुद्धि, धर्मश्रद्धा व भगवनिष्ठा उत्पन्न होऊन त्यांचा वृत्ति पालटेल आणि प्रापंचिक दुःखांचा विसर पाडून घेऊन मनास रंजवून घेण्याकरितां नाटकगृहांत घटकाभर काळ घालविणारे जे आह्मी, ते अशा श्रेष्ठ सत्पुरुचरित्रदर्शनानें “ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी ' अशा स्थितीत पोह इतकेच नाही तर, त्यायोगे या मायिक संसाराच्या आणि या ऐहिक सुखोपभोगाच्या क्षणभंगुरतेचा आम्हांस पूर्ण बोध होऊन, हा प्रपंच रहाटत असतां मनास खरी शांति व समाधान व देहात खरे सुख उत्पन्न करून घेण्याचा श्रेष्ठ मार्ग ह्मणजे एक भगवद्भक्तीच होय, आणि या मागानेच गेले असतां देहाचे सार्थक होईल हा सद्बोध आमच्या मनावर कायमचा ठसेल, अशी पूर्ण उमेद आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या जीवनचरित्राशी ज्यांनी पूर्ण परिचय करून घेतला आहे असे जे निद्याव्यासंगी व इतिहासज्ञ पुरुष चा महाराष्ट्रांत आहेत त्यांमध्ये, आमचे येथील लोकमान्य, बहुश्रुत व विद्वान् हरिभक्तपरायण श्रीपति रघुनाथबोवा भिगारकर यांच्या सारखा पुरुष आज नाहींच असे छूटले तरी चालेल. मी आपल्या अल्पबुद्धीने लिहिलेल्या या नाटकाची हस्तलिखित प्रत रा. रा. भिंगारकरवोवा यांस वाचून पाहण्याविषयी विनंति वेली. ती मान्य करून त्यांनी आपला अमोल वेळ खर्चन माझे नाटक साद्यंत मनःपूर्वक धाचून पाहिले. हे नाटक लिहितांना मी वाचलेल्या ग्रंथांशिवाय, हल्ली अनुपलब्ध ग्रंथांतील रा. रा. भिंगारकरबोवा यांच्या वाचण्यांत आलेल्या श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या अवतारासंबंधी हृदयंगम कथा मला सांगून त्या या नाटकांत गोवण्याविषयी त्यांनी मला सुचना केली; तसेच श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या संबंधाने निरनिराळ्या चरित्रकारांनी आपापल्या ग्रंथांत नमूद केलेल्या गोष्टींच्या कालासंबंधाने आज बरीच वर्षे ऊहापाह होऊन त्यांचा जो कालानर्णय सांप्रत निश्चित झाला आहे आणि श्रीविष्णूंनी ज्ञानदेव व ज्ञानेश्वर या दोन नांवांनीं भिन्नभिन्न काळी पृथक पृथक अवतार धारण केले होते किंवा श्रीविष्णूंच्या एकाच अवताराला ही भिन्नभिन्न नांवें होती, या वादग्रस्त विषयांसंबंधाने साधकबाधक प्रमाणांअंती जो निर्णय सुज्ञ व विचारी समाजानुमते अखेर ग्राह्य झाला आहे, त्याचेही त्यांनी मला यथार्थ ज्ञान करून दिले. तसेच अशा लोकोत्तर महात्म्यांच्या चरित्रनाट