पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० श्रीज्ञानेश्वरमहाराज. पशूच्या जड देहाप्रत पावलों. गतजन्मीं मी जगत्पालाचा घोडा । होतो आणि या जन्मीं महिषरूपाने मी सद्गुरुंच्या चरणांपाशीं हा कालपर्यंत राहिलो. तरी आतां सद्रूंनी माझा उद्धार करावा! ? अशा रीतीने त्या दिव्य पुरुषाने केलेली प्रार्थना ऐकून, श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं तू तिस-या जन्मीं मनुष्यदेहाप्रत जाशील आणि तेव्हां संतसमागमानें तुझा उद्धार होईल, असा त्यास आशीर्वाद दिला ! तो आशीर्वाद ग्रहण करून त्या दिव्य पुरुषाने साष्टांग नमस्कार घातला आणि एकदम अदृश्य झाला ! मग सङ्गुरूंनी त्या पशुदेहाला स्नान घालून एक खाच खणून तींत त्यास समाधि दिली! आणि त्या समाधीवर आपल्या हातांनी एक धोंडा ठेवून, त्याला शेंदूर फासून, त्याचे नांव * ज्ञानोबा ' असे ठेविलें। आणि त्या समाधीजवळ एक अजानवृक्ष लाविला ! महाराज, तुम्हाला काय सांगू ? सद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराज यांच्या मुखांतून निघालेल्या “तथास्तु ? वाणीची सत्यता सङ्गुरूंनी आळ्याकडे पाठ फिरवितांच सर्व ब्रह्मवृंदास पटू लागली ! चतुर्वेद पठण केलेल्या श्रेष्ठ ब्राम्हणांना वेदविस्मृति होऊ लागली! आणि आमच्या यासारखां टवाळ पोरें मंदबुद्धि होऊन त्यांच्या वाणांतून वेदोच्चार स्पष्ट निवेनासा झाला ! म्हणून या पोराला सङ्गुरूंच्या पायांवर घालन त्यांचा आशीर्वाद घेण्याकरितां मी येथे आलो आहे ! | गृहस्थ-आजोबा, संतवाणी अन्यथा होऊ नये म्हणून सरस्वतीने सुद्धा त्यांची आज्ञा पाळली आ ? केवढे हो या जगद्गुरूंचे थोर सामर्थ्य ! महाराज, जगद्गुरूंच्या दर्शनाला मी माझ्या नित्याच्या परिपाठाप्रमाणे निवालों आहे, तर माझ्याबरोबर चलून या मुलाला तुम्ही सद्गुरूंच्या पायांवर घाला आणि अनन्यभावाने सद्गुरुंना शरण जा ! म्हणजे सद्गुरुकृपा झाली तर, हा मुलगा बृहस्पति होऊन तुमचे पांग फेडील ! ( इतक्यांत पडदा उघडतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज व मुक्ताबाई आसनस्थ असून त्यांचेभोवती अळंकापुरवासी स्त्रीपुरुषसमूह उभा आहे व त्यांपैकी कित्येक पुरुष व कित्येक स्त्रिया भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांपुढे व मुक्ताबाईपुढे लोटांगण घालीत