पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ८१ आहेत, कित्येक पुरुष हात जोडून मुखानें • गतं दुःखं गतं पापंस्व ? असें ह्मणत आहेत व कित्येक स्त्रिया मुक्ताबाईला प्रदक्षिणा घालीत आहेत, असा देखावा दृष्टीस पडतो. ) बहिरंभट-( धड्यास श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पायांवर घालून व आपण स्वतः त्यांस नमस्कार घालून व त्यांच्यापुढे हात जोडून उभा राहून ) सद्रुमुखांतून आळ्याच्या वनांत निघालेल्या “तथास्तु' वाणीप्रमाणे हा माझा मुलगा मंदबुद्धि होऊन याच्या मुखांतून वेदोच्चार स्पष्ट निघेनासा झाला आहे ! तरी सद्रूंनी या अज्ञान बालकाकडे कृपादृष्टीने अवलोकन करून यास बुद्धिज्ञान द्यावे, हेच माझे सद्गुरुचरणीं लीन होऊन मागणें आहे ! ज्ञानेश्वर-महाराज, श्रीपांडुरंगाने या दासाकडून वदविलेली अक्षरें अन्यथा करण्याचे सामर्थ्य श्रीपांडुरंगावांचून कोणालाही नाहीं ! तरी महाराज, माझी आपणास अशी प्रार्थना आहे कीं, या बालकाकडून श्रीपांडुरंगाची भक्ति करवा, म्हणजे श्रीपांडुरंगकृपेने हा बालक सज्ञान होऊन, याच्या हातून तुमच्या कुळाच उद्धार होईल ! बहिरंभट- सद्रुमहाराजांची अशी अनुज्ञा होत आहे, तर मी या मुलाकडून श्रीपांडुरंगाची उपासना व पंढरीची वारी हेच एक व्रत जन्मभर पाळवीन ! झणजे सद्रूंच्या आशीर्वादाप्रमाणे हा सज्ञान होऊन याच्या हातून आम्हां सर्वत्रांचा उद्धार होईल ! ज्ञानेश्वर - तथास्तु ! ( इतक्यांत चांगदेवशिष्य प्रवेश करतो.) चांगदेवशिष्य-( मनाशी ) काय हो हें आश्चर्य ! इतके पुरुष आणि इतक्या स्त्रिया येथे जमून कोणत्या सिद्धांचे दर्शन घेत आहेत बरें ! ( दर्शन घेऊन परत जाणा-या पुरुषांस व स्त्रियांस उद्देशून ) अहो, या क्षेत्राचे नांव काय आणि हीं पलीकडे कोणची नदी वाहात आहे, हे मला सांगतां काय ? । गृहस्थ- या क्षेत्राला अलंकापुर म्हणतात; आणि पलीकडे अनंतजन्मांची पापे धुवून टाकणारी पवित्र इंद्रायणी नदी वाहात आहे !